प्रमोद चौधरी
एरंडोल । प्रतिनिधी :
एरंडोल तालुक्यातील पोलिस ठाणे स्तरावरील कायदा व सुव्यवस्था,जातीय सलोखा व शांतता समिती साठी आमदार चिमणराव पाटील यांच्या शिफ़ारशीनुसार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार एरंडोल तालुकयातील शहर पोलिस ठाणे स्तरावरील कायदा व सुव्यवस्था,जातीय सलोखा व शांतता समिती गठीत करण्यात आली आहे.
उपविभागीय तथा दंडाधिकारी एरंडोल हे पदसिध्द अध्यक्ष असुन, तहसीलदार एरंडोल हे सदस्य व पोलीस निरीक्षक,पोलीस स्टेशन एरंडोल हे सदस्य सचिव आहेत तसेच अशासकिय सदस्य म्हणुन श्री.कुणाल रमेश महाजन नगरसेवक, सर्व समाजातील मान्यवर व्यक्तींनमध्ये श्री. सुभाष सोनु मराठे, श्री.सुनिल पांडुरंग चौधरी, अड. श्री.प्रेमराज भागवत पाटील, श्री नानाभाऊ पोपट महाजन श्री. उखर्डु भिला वाल्डे, श्री. गणेश नामदेव महाजन यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे..

