पुनाळ । प्रतिनिधी (सुरेश वडर) :-
राज्यात सुरु असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र लाॕकडाऊन सुरु असल्याने यात्रा,जत्रा,सांस्कृतिक कार्यक्रम यासह विविध कार्यक्रम बंद असल्यांने महाराष्ट्रातील विविध लोककलावंतानवर उपासमारीची वेळ आली आहे.राज्य शासनाकडुन त्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी संघर्ष बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सुर्यवंशी यांनी कोल्हापूरचे निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तमाशा कलावंत,आॕर्केस्ट्रा,बेंजो पाटी,बॕन्ड पार्टी,वाघ्यामुरळी,जोगती,भारुड कलावंत यासह अन्य कलावंताचे उपजिवीका या कलेवरच अवलंबून असल्याने त्यांच्या कुटुंबाची दैनिय अवस्था निर्माण झाली आहे.याची दखल घेऊन शासनाने यांना किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी तसेच शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळवुन द्यावे आसे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी संस्थापक अध्यक्ष संतोष सुर्यवंशी,राज्य सचिव रमेश कांबळे,जिल्हा संघटक अनिल कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष साताप्पा पोवारा,करवीर तालुका उपाआध्यक्ष आशोक कांबळे,पन्हाळा तालुका उपाअध्यक्ष प्रवीण कांबळे,युवराज वांद्रे,राजाराम कांबळे,शांतीसागर कांबळे,अमर लोखंडे,अतुल सुर्यवंशी,आमोल कांबळे उपस्थिती होते.
निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे साहेब यांना निवेदन देताना संतोष सुर्यवंशी,रमेशा कांबवळे व आदी.

