shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

येवला येथे राऊळ समाज युवक संघटनेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण..!


दि. 5 जून 
येवला । प्रतिनिधी-संतोष राऊळ

नाशिक जिल्ह्यातील तालुका येवला येथे शहरातील श्री.रोकडे हनुमान मंदिर येथे राऊळ समाज युवक संघटनेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन निमित्त वृक्षारोपण व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. 

सदर कार्यक्रमासाठी  प.पू.संदीपगिरी महाराज, येवल्याचे नगराध्यक्ष श्री. बंडूभाऊ क्षीरसागर, येवला राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्री. दिपकभाऊ लोणारी, येवला राष्ट्रवादी उपाध्यक्ष श्री. शंकर(गोटुभाऊ)मांजरे, येवला राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग प्रमुख श्री. सुभाषभाऊ गांगुर्डे, येवला राष्ट्रवादी सरचिटणीस श्री. थोरातभाऊ व श्री.रुपेशभाऊ दराडे हे प्रमुख मान्यवर म्हणून लाभले. 

यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राऊळ समाजातील जेष्ठांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा शाल,श्रीफळ व वृक्षांची रोपे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.याप्रसंगी नगराध्यक्ष बंडूभाऊ क्षीरसागर यांनी वृक्षांचे महत्व पटवून देत कोरोना काळातील ऑक्सिजनचे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले.
 
राऊळ समाजातील युवकांनी शहरातील नागरिकांना रोपांचे वाटप केले.तसेच पर्यावरण रक्षण व वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राऊळ समाजातील युवकांनी परिश्रम घेतले.
close