shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लेखक दिग्दर्शक मिलिंद वानखेडे यांचा रांछल - धी डेडली फाॅरेस्ट या हिंदी चित्रपटाची लवकरच चित्रीकरणाला सुरवात..!!






(Ranchal - The Deadly Forest)
प्रतिनिधी पुणे 
जगात कोविड 19 चा त्रास अर्थात लाॅकडाउन चा त्रास सर्वच कलाकार - तंत्रज्ञानाच्या लोकांना झाला.


अशा वेळी M S PRODUCTION चे मिलिंद वानखेडे  आणि सुहास वैद्य यांनी एक धाडसी पाऊल उचलून सहा महिन्यापूर्वी एका नवीन हिंदी चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. 

पुण्यातीलच काही नवीन आणि काही अनुभवी कलाकारांना घेऊन या चित्रपटात अभिनयाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रांछल  - धी डेडली फाॅरेस्ट ( Ranchal - The Deadly Forest) असे ह्या चित्रपटाचे नाव असून , अभिनेते श्री सुहास वैद्य प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.

लेखक दिग्दर्शक श्री मिलिंद वानखेडे आणि अभिनेते श्री सुहास वैद्य, यांच्या M S PRODUCTION तर्फे ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

 
रांछल - धी डेडली फाॅरेस्ट हा सस्पेन्स, हाॅरर आणि हिस्टाॅरिकल थ्रीलर बेस चित्रपट आहे.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्री.मिलिंद वानखेडे करत असुन संवाद लेखनाची जबाबदारी शुभ्रा कुलश्रेष्ठ यांनी सांभाळली आहे.

श्री.विशाल म्हाळगी हे ह्या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत. निर्माते श्री सुहास वैद्य यांची एक वेगळी भुमिका यात पहायला मिळणार आहे.

यात सहभागी होणारे कलाकार आहेत सोमनाथ गिरी,मनोज राठोड,विजय शर्मा, सुनिल चौधरी
सूरज गायकवाड,प्रणित डुंबरे, माधव गायकवाड,हर्षवर्धन चिपडे,साधना कशिद,पद्मश्री उपळे,निशांत सिंह,विजय शर्मा, आदित्य सिंह,शिवानी शरण,रेवती कुलकर्णी,अर्जिता लाल,विनायक रायकर,मिलिंद संगवार,  चंद्रकांत मुळगुंदकर,अथर्व नगरकर,सुहास वैद्य.  पुण्याच्या अनन्या फिल्मस यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. 

हा नवा चित्रपट प्रेक्षकांना निश्चितच आवडेल यात शंका नाही, असे मत निर्माते श्री सुहास वैद्य यांनी व्यक्त केले.

सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, लवकरच म्हणजे येत्या 25 जून पासून पुणे, सातारा  आणि कोल्हापूर येथे हया चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे.
close