शिर्डी शहर प्रतिनिधी :
राहाता तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री नामदार सन्मा. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिर्डी येथे भाजपा युवा कार्यकर्ते नानासाहेब शिंदे पाटील यांनी गरजू लोकांना धान्य वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.
कोरोना महामारी मुळे अनेक लोकांना कामधंदा नसल्यामुळे गरीब लोकांवर मोठ संकट आले आहे. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धान्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी पत्रकार संजयजी महाजन, अविनाश वाबळे, सागर भंडारे, समीर नाईक व मित्र परिवार उपस्थित होते.

