वरिष्ठांनी कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा .. श्री . प्रदिप सूर्यवंशी
प्रतिनिधी :संजय वायकर :
वर्धा (दि. ४) : कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून आणि कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरून वर्धा एसटी विभागातील काही अधिकारी मनमानी कारभार करून कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत . अशी संघर्ष एसटी युनियन वर्धा विभागीय अध्यक्ष श्री . प्रदिप सुर्यवंशी यांनी माहिती दिलीीीी.
३१ मे रोजी युनियनच्या सभासद सुषमा धोंगडे यांची कामगिरी वर्धा - यवतमाळ या भागात असताना सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार एसटीला ५० % प्रवासी वाहतूक करण्याचे परिपत्रक असूनही वर्धा आगाराचे वाहतुक निरीक्षक यांनी जबरदस्तीने महिला वाहकाच्या एसटीत ३५ प्रवासी भरून वाहकाचे न ऐकता त्यांना अरेरावीची भाषा वापरली .
अशा परिस्थितीत गाड़ी मार्गस्थ असताना जर तपासणी झाली तर वाहकालाच कारवाई चा त्रास सहन करावा लागतो .
या घटनेबद्दल महिला वाहकाने आगार व्यवस्थापक, विभाग नियंत्रक, . जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे पुराव्यासहित लेखी तक्रार केली आहे .
कोराना काळात जिल्हाधिकारी यांनी ५० % वाहतूक करण्याचे दिलेल्या आदेशा विरोधात याआधीही प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक या विभागात होत असल्याची तक्रार वारंवार केली गेली आहे .
महिला वाहक यांचे तक्रारीवरून संबंधीत अधिकाऱ्यावर वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघर्ष एसटी युनियनचे अध्यक्ष श्री.प्रदिप सुर्यवंशी यांनी दिला आहे .

