shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक भरती केंद्रीय पध्दतीने असतांनाही बेकायदा शिक्षक भरती करणाऱ्या संस्थावर कारवाई करून भ्रष्ट मार्गाने झालेली भरती बेकायदेशीर ठरवणे -अशोक सब्बन



अहमदनगर (शौकतभाई शेख):-  राज्यामध्ये TET परिक्षा उत्तीर्ण झालेले गुणवत्ता धारक हजारो बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात असून  गुणवत्ता धारक प्राधान्यक्रम असलेले शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. 
अशा परिक्षा पुन्हा घेवून प्रतिक्षा यादी तयार करून सर्वच गुणवत्ता धारक बेरोजगार युवकांची पुन्हा फसवणूकच होणार आहे असे निदर्शनास येते.

शासनाने शिक्षक भरतीसाठी TET परिक्षा सक्तीची केली व ती परिक्षा उत्तीर्ण असणारेच गुणवत्ता धारक उमेदवाराची प्रतिक्षा यादी करून पारदर्शकपणे  त्यानाच शिक्षकांच्या पदावर सामावून घेणार होते.पण प्रत्यक्षात मात्र मागच्या झालेल्या TET परिक्षा मधिल उत्तीर्ण झालेले अगदी नगण्य युवकांनाच नोकऱ्या मिळाल्या आहे.  

2012 पासून संस्थाना शिक्षक भरती करण्यास मनाई करण्यात आली असतांनाही राज्यातील अनेक शिक्षण संस्थानी बेकायदशीर,पळवाटा काढून लाखो रूपयांचा भ्रष्टाचार करून भरती केली त्या मुळे कायद्याचे राज्य हि संकल्पना स्विकारून TET च्या परिक्षा अभ्यासपूर्ण पध्दतीने देवून उत्तीर्ण होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी व संस्था चालकाच्या संगनमताने आर्थिक भ्रष्टाचार करून फसवणूक केली आहे.

राज्यातील अनेक शिक्षण संस्थानी शिक्षक भरती ही TET व केंद्रीय पध्दतीने असतांनाही ते नियम डावलून ,संपूर्ण खोटे रेकॉर्ड तयार करून,9वी व 10वीच्या वर्गाला शिकवण्या साठी जागा भरल्या असे लंगडे समर्थन करीत बेकायदा भरती करून त्याला कायदेशीर स्वरूप आणण्याचा खटाटोप केला आहे. या मुळे प्रामाणिकपणे कायद्याचीबुज राखणाऱ्या सर्वच गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक झाल्यामुळे असंतोषाची भावना निर्माण  झाली आहे. 

 मनमानी पध्दतीने आपल्या मर्जीतील, आर्थिक भ्रष्टाचार करून अहमदनगर जिल्ह्यांमध्ये सुमारे 700 पेक्षा जादा   शिक्षकांच्या जागा भरल्या आहेत व सध्या अजून ही भरत असल्याचे निदर्शनास  येत आहे.
TET उत्तीर्ण व TET परिक्षा देवू इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी संघटीत होवून हा लढा आपल्या हक्क व अधिकारा साठी देणे आवश्यक आहे.   
बेकायदा शिक्षक भरती केलेल्या शिक्षण संस्था व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई होण्यासाठी संघटीत होणे आवश्यक आहे.असे अवाहन भ्रष्ट्राचार विरोधीजन आंदोलनाचे सरचिटणीस श्री अशोक सब्बन यांनी केले. 
   *अनेक शिक्षण संस्थाच्या बेकायदा भरती संदर्भात शासन व प्रशासनाला या भ्रष्टाचाराची चौकशी करून  दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे व संस्था चालकांवर कडक कायदेशीर कारवाई   करून केलेली भरती बेकायदा ठरवून ती संपूर्ण रद्द करावीअशी मागणी* मा.मुख्यमंत्री,मा. शिक्षण मंत्री, सामाजिक न्याय विभाग, मा.आयकर अधिकारी , मा. धर्मदाय आयुक्त,मा. लाचलुचपत विभाग यांच्याकडे करून  त्याचा पाठपुराव करीत आहे.

शासनाने या प्रकरणात त्वरीत दखल घेवून चौकशी करून दोषीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अन्यथा याच्या विरोधात आंदोलन तीव्र करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.
- अशोक सब्बन
राज्य सचिव : भ्रष्टाचार विरुद्ध जन आंदोलन
close