shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कान्हुराज बगाटे यांनी सदगुरू गंगागिरी महाराज संस्थान येथे भेट घेऊन केली संपूर्ण परिसराची पाहणी..!!

शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कान्हुराज बगाटे साहेब यांनी मंगळवारी रोजी सदगुरू गंगागिरी महाराज संस्थान येथे भेट दिली व सरला बेट संस्थानच्या वतीने सुरू असलेल्या भव्य मंदिर बांधकाम, प्रसादालय, गौशाळा, श्री साईबाबा शताब्दी धर्मशाळा, बेटांवर असलेली शेती, कीर्तन, प्रवचन, धार्मिक शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांची भेट घेऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली.

श्री साईबाबांचा व सदगुरू गंगागिरी महाराज असलेला स्नेह संबंध तसेच धार्मिक बाबीवर सरला बेटाचे मंठाधीपती महंत रामगिरी महाराज यांच्या सोबत चर्चा केली व सर्व परिसर व काम पाहून समाधान व्यक्त केले तसेच महाराजना शिरडी भेटीचे निमंत्रण दिले. सरला बेटाचे वतीने श्री कान्हुराज बगाटे याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अँड सदिप कुलकर्णी, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज कडलग व विद्यार्थी उपस्थित होते.
close