shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हॉटेल भिगवण स्पेशल मच्छी हाऊसचे उद्घाटन अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते संपन्न.

हॉटेल भिगवण स्पेशल मच्छी हाऊसचे उद्घाटन अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते संपन्न.
नवयुवकांसाठी  नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला.. अमोलराजे इंगळे.
माढा: पुणे सोलापूर हायवे वरवड टोल नाक्या नजीकच्या ठिकाणी सुशिक्षित तरुण युवक केशव सावता देवकर राहणार चिंचोली तालुका माढा जिल्हा सोलापूर यांनी नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला म्हणून इतर मित्रांच्या अनुभवातून त्यांनी हॉटेल भिगवण स्पेशल मच्छी हाउस याची उभारणी केली असून याचे उद्घाटन युवा उद्योजक अमोल राजे इंगळे यांच्या हस्ते संपन्न केला. 
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून दिनेश लोंढे ,(आर डी एल इंडस्ट्रीज चे ओनर), ज्योतीराम (बापू)पाटील. धनाजी लोंढे (माजी सरपंच), प्रवीण टोंगळे,  बाजी पाटील, सतीश उमाटे, वैभव टोंगळे, पप्पू आरे, महादेव लोंढे ,अर्जुन देवकर, हरिदास गवळी, दत्तू चोपडे, संतोष लोंढे सर इत्यादी उपस्थित होते

यावेळी  अमोलराजे इंगळे  म्हणाले की, आपण उभा केलेल्या हॉटेल भिगवण स्पेशल मच्छी हाऊसचे उद्घाटन झाल्याचे स्पष्ट करून आपण उभारलेल्या व्यवसायाची भरभराट व्हावी आणि त्यांचा आदर्श युवकांनी घेऊन नोकरीपेक्षा व्यवसाय अतिशय चांगला असून नवयुवकांनी व्यवसायाकडे जास्त लक्ष देऊन आपली प्रगती यशस्वी रित्या करून जीवन सुख समृद्धीने घडवावे अशा शब्दात मनोगत व्यक्त करून केशव देवकर यांना शुभेच्छा दिल्या.
close