पुनाळ । प्रतिनिधी(सुरेश वडर):- माजनाळ (ता.पन्हाळा)येथील विद्या मंदिर शाळेत कोरोनाचे अलगीकरण कक्ष आहे.या कक्षास पन्हाळ्याचे प्रांताधिकारी अमीत माळी,व पन्हाळ्याचे अप्पर तहसीलदार सोनवने साहेब यांनी पश्चिम पन्हाळा परीसरातील कोरोनाच्या संदर्भात आढावा बैठकीच्या दौऱ्या दरम्यान या कक्षास भेट दिली.
येथे असणाऱ्या कोरोना रुग्णांची अंत्यंत चांगल्या
पद्धतीने विचारफुस केली व या संकटातून आपण लवकरच बरे व्हाल कोरोनाच्या संदर्भातील सर्व नियम पाळा असे सांगितले.
यावेळी कळेचे मंडळ अधिकारी सुरेश ठाकरे,विस्तार अधिकारी पि.डी.भोसले.,ग्रामसेवक गणेश जाधव,तलाटी विनय पाटील,आरोग्य सेवक परीट साहेब,उपसरपंच केदार पाटील,कोतवाल सुरेश वडर,पोलीस पाटील निता पाटील,ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी,कोरोना दक्षता समीतीचे सर्व पदाधिकारी व सदस्य,अंगणवाडी सेवीका,अशा वर्कर,उपस्थिती होते.
पश्चिम पन्हाळा परीसरातील कोरोना आढावा बैठकीच्या दौऱ्या दरम्यान माजनाळ येथील अलगीकरण कक्षास भेटीवेळी प्राताधिकारी अमित माळी व इतर.