ग्रामीण भागातील मुस्लिम समाजातील दुर्लक्षित घटकांचे सामाजिक, शैक्षणिक विकास आणि राजनितीक सशक्तीकरण व्हावे, शिक्षण व रोजगारात भागिदारी मिळावी आणि न्याय व अधिकारासाठी संवैधानिक मार्गाने संघर्ष करण्यात मुस्लिम समाज सक्षम व्हावा यासाठी महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषद या संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषद या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा, श्री मराठाखान साहेब
यांनी राहाता शहरातील तय्यबा मस्जिद मध्ये भेट दिली. यावेळी श्री मराठाखान म्हणाले की मुस्लिम समाज मोठ्या संख्येने हातावरची मोलमजुरी करणारा समाज आहे. रोजचे कमावणे आणि रोजचे खाणे, मात्र कोविड संकटाच्या लॉकडाऊन मुळे उत्पन्नच खुंटल्याने त्यांच्या व्यवसाय व आर्थिक बाबींची मोठी वाताहात झाली आहे. कोविड बरोबरच व्यावसायिक व आर्थिक अशा तिहेरी संकटात सापडलेल्या मुस्लिम समाजाला पुन्हा ऊभारी मिळावी आणि रोजगाराची संधी व्हावी त्यांची आर्थिक घडी बसावी या करीता महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषद प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले, पुढे बोलतांना श्री मराठाखान म्हणाले राज्यात दुय्यम संख्येने असलेला मुस्लिम समाज हा एकजुट नसून विखुरलेल्या अवस्थेत आहे. समाजातील छोटे -मोठे अशा सर्वांना लघु व्यवसायाच्या माध्यमातून एकत्र आणून प्रत्येक जिल्ह्यात, तालुका स्तरावर लघुउद्योग निर्माण करणे यापासून मोठ्यांना नफा व छोट्यांना रोजगार उपलब्ध करून देणे.
असे संघटनेचे धोरण आहे. या सोबतच सर्व जातीधर्मां मध्ये जातीय सलोखा कायम रहावा, सर्वांनी एकत्र येऊन समाज उन्नतीसाठी कार्य करावे, सर्वांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून कामे केल्यास सर्व समाजाची प्रगती होते. शेवटी असेही ते म्हणाले.या प्रसंगी तय्यबा मस्जिदचे इमाम मौलाना हाफिज जा़हीर साहब यांच्या हस्ते श्री मराठाखान साहब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोणी येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री फारूकभाई पठाण, पत्रकार तथा आर टी आय कार्यकर्ते अजिज शेख ,पत्रकार शाह मुश्ताकअली,
तय्यबा मस्जिद ट्रस्टी तथा सामाजिक कार्यकर्ते इलियासभाई शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीरभाई बेग, मुन्नाभाई सय्यद (फिटर), राष्ट्रवादी काँग्रेसचे इरफानभाई शेख, सुलेमान शेख, सद्दाम शेख, मतीन बादशहा पठाण, अन्सार शेख, समीर इनामदार, फय्याजभाई शेख, राजुभाई पठाण आदी उपस्थित होते...