shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उनाड वारा साहित्य परिवार आयोजित दिग्गजांच्या कविता नवोदितां कडुन सादरीकरण, स्पर्धा यशस्वी पार पडली..!


कोल्हापूरप्रतिनिधी(सुरेश वडर) : सांगली येथील उनाड वारा साहित्य परिवाराचे प्रमुख अवीनाश शिंदे यांच्या संकल्पनेतुन राज्यस्तरीय दिग्गजांच्या विविध विषया वरील काव्य वाचन स्पर्धा नवोदित कवी कवयत्री यांच्या कडून गुगल मिटवरुन सादरीकरण झाले.सदर काव्य वाचन स्पर्धा सांगली येथे मोठ्या भव्य दिव्य असे संपन्न होणार होते पण,कोरोनाची महामारीमुळे गुगल मिटवरून झाले.


कवी सुरेेश वडर 

सांगली येथे होणारे कवी संमेलन तात्पुरत्या काळासाठी स्थगित केलं . आणि  गुगलमीट अँपद्वारे ऑनलाईन कवी संमेलन घेतले . आणि एक दिवस अविनाश शिंदे  सरांच्या डोक्यात एक कल्पना आली की , आपण स्वतःच्या कविता सादर करतच असतो . पण आपण आपल्या दिग्गज कवी  /  कवयित्रीच्या कविताही सादर करायला हव्यात . ही संकल्प मनात ठेवून , त्यांनी एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे नियोजन करून , त्यांनी साहित्य क्षेत्रात एक इतिहास घडविला आणि गुगलमीट अँपद्वारे दिग्गजांच्या कविता व नवोदितांचे सादरीकरण , अशा प्रकारे काव्यस्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.या स्पर्धेचे आयोजन कवी अविनाश शिंदे यांनी केले, तर या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कवी अरविंद भामरे यांनी काम पाहिले. ह्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये , 
कवी  -  संजय जाधव  -  बालकवी 
कवी  -  हरिहर आनंदहरी  -  विंदा करंदीकर 
कवी  -  प्रविण पुजारी  -  सुरेश भट 
कवी  -  युवराज जगताप  -  ग्रेस 

कवी  -  अनिल केंगार  -  वामनदादा कर्डक 
कवी  -  जयराम मोरे  -  सुरेश भट 
कवयित्री  -  प्रा . त्रिशिला साळवे  -  मंगेश पाडगावकर 
कवयित्री  -  वंदना राऊत  -  बहिणाबाई चौधरी 
कवयित्री  - अस्मिता इनामदार  -  इंदिरा संत 
कवयित्री  -  मनीषा रायजादे पाटील  -  सुरेश भट 
कवयित्री  -  रोहिणी गंधेवार  - शांताबाई शेळके 
कवयित्री -  दिपाली अष्टुरे  -  मंगेश पाडगावकर 

ह्या सर्व कवी  /  कवयित्रीनी दिग्गजांच्या प्रत्येकी दहा कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. 
सहा गटातून तीन नंबर काढणे . खरंच खूप अवघड काम होतं . पण परीक्षक कवी , अरविंद भामरे सरांनी अगदी काटेकोरपणे  निरीक्षण करून तीन नंबर काढले .             
प्रथम  क्रमांक.
१) श्री. संजय जाधव
२)हरिहर आनंदहरी
( बालकवी, विंदा करंदीकर
*व्दितीय  क्रमांक* 
१)रोहिणी गंधेवार
२)दिपाली अष्टुरे 
( शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर )
*तृतीय  क्रमांक*
१)प्रा. त्रिशिला साळवे
२)वंदना राऊत
( मंगेश पाडगावकर, बहिणाबाई चौधरी)

सलग सहा दिवस ही काव्यमय शृंखला , आनंदमय , प्रेममय आणि शांतपणे पार पडली . आणि सगळ्या कविता बहारदार असल्यामुळे आनंद गगनात मावत नव्हता. कामात सगळे व्यस्त असूनसुद्धा , वेळातवेळ काढून काव्यस्पर्धा छान केली . मला माझ्या उनाड वारा साहित्य परिवाराचा अभिमान आहे . असं सांगत कार्यक्रमाच्या मान्यवरांनी सहभागी कवी  /  कवयित्रीना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
close