शिरूर । प्रतिनिधी :
कोरोना महामारी मुळे साऱ्या जगतावर संकट आले आहे. या कालावधीत विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सप्तरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कागल यांच्या वतीने कोरोना कालावधीत विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना कोरोना योद्धा पुरस्कार सोहळा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला.
यामध्ये संपादक सुनिल नामदेव भोसले, श्री प्रशांत प्रकाश पवार शिरूर पुणे, समाजसेवा, श्री.श्रीकांत धुमाळ समाजसेवा ज्योतिष शास्त्र, डॉक्टर प्रवीण नीचत, मुंबई, आरती बनसोडे, पत्रकार स्नेहा उत्तम मडावी चंद्रपूर, प्रियंका वाकडे समाज सेविका कवयत्री, पंढरीनाथ चौधरी नायगाव पुणे वरिष्ठ क्लार्क
संपादक.सुनील ज्ञानदेव भोसले यांनी लोक जागृतीचे कार्य आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून केले,तसेच गरजू व्यक्तींना अत्यावश्यक धान्य किट चे वाटप केले. याबद्दल संपादक सुनील ज्ञानदेव भोसले यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
श्री प्रशांत प्रकाश पवार हनुमाननगर मित्र मंडळ व ट्रस्ट शिरूर व सोशल मीडिया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शिरूर या माध्यमातून त्यांनी 2-03-2021पासून हनुमान नगर परिसरात सोडियम हायड्रोक्लोरिक फवारणी दर तीन दिवसाला कोणत्याही प्रकारचा खंड न पडता करत आहे. याबद्दल प्रशांत पवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
डॉक्टर प्रवीण नीचत, शतायुषी निसर्ग उपचार केंद्र व होप फाउंडेशन, मुंबई हे सामाजिक बांधिलकी जपून कोरोना कालावधीत निशुल्क घरघुती उपचार माध्यमातून रुग्णांची सेवा करीत आहे. तसेच त्यांनी आदिवासी गरजू पारधी समाजाला अत्यावश्यक अन्नधान्य वाटप केले याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केले आहे.
डॉक्टर श्रीकांत धुमाळ पुणे ज्योतिषशास्त्र यांनी आदिवासी पारधी समाजाला दत्तक घेतले आहे व त्यांना चुकता दर महिन्याला अत्यावश्यक अन्नधान्य व तिचे वाटप करतात.
कोरोना कालावधीत वरील व्यक्तींनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे याबद्दल यांना प्रोत्साहन देण्यासाठी सप्तरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कागल यांच्या वतीने कोरोना कालावधीत विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

