ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ च्या नवनियुक्त पदाधिकारी यांचा भटक्या विमुक्त जाती जमाती संघटना व आमचे मेंबर मित्र परिवार इंदापूर यांच्या वतीने सत्कार..!!
इंदापूर: १६ जून रोजी इंदापूर तालुका ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ च्या पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ पंचायत समिती येथे संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ च्या इंदापूर तालुका कार्यकरणी सदस्यांची निवड प्रक्रिया दि. १३ जून २१ रोजी पार पडली. यावेळी सर्वानुमते लक्ष्मीकांत जगताप यांची अध्यक्षपदी निवड केली तसेच सचिव नीलकंठ गिरी, महिला उपाध्यक्ष अंबिका पावशे, सहसचिव फिरोज पठाण, जिल्हा संघटक स्वप्नील गायकवाड यांच्या निवडीबद्दल भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे तानाजी धोत्रे , आमचे मेंबर मित्र परिवार इंदापूरचे अनिल पवार, माय लाईफस्टाईल मार्केटिंगचे अधिकारी संतोष लोखंडे ,कांबळे सर यांच्या वतीने इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट व ग्रामसेवक युनियनचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला
याप्रसंगी बहुजन परिषदेचे दत्ता बाबर, आरोग्य रुग्ण समितीचे दादा मोरे यांचाही सत्कार सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र पवार व पत्रकार संतोष भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

