shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (१).... "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ! भेदा भेद भ्रम अमंगळ "..!!

पर्यावरण जनजागरण (१)

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म !
भेदा भेद भ्रम अमंगळ !!
जगद्गुरु संत तुकारामांनी हे आपल्या अभंगात नमूद केलेले वचन आज पर्यावरण या विषयाबद्दल बोलताना मला मुद्दामून नमूद करावेसे वाटते.

महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण ज्याला आपला देश म्हणतो, आपल्या देशाच्या सीमा म्हणतो याला पर्यावरणीय संज्ञेत कोणतेही स्थान नाही. कारण पर्यावरण म्हटले की संपूर्ण ब्रह्मांडाची रचना विचारात घ्यावी लागते. कारण आपल्या भारताच्या सीमेवर केलेले वृक्षारोपण आणि त्यातून तयार होणारा दररोजचा प्राणवायू हा केवळ भारतीय लोकांसाठी उपयोगात येणार आहे काय?  तर याचे उत्तर आहे हा प्राणवायू पाकिस्तानात पण जाईल, हिमालयात जाईल. संपूर्ण ब्रम्हांडात जिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो तिथे अन्यत्र असलेला वायू धाव घेतो आणि असे सृष्टीचक्र आहे.त्यामुळे हवेला ब्रम्हांड हे क्षेत्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग ! वैष्णवांचा धर्म !! भेदाभेद भ्रम! अमंगळ..!!

वृक्षारोपण करून झाडे लावणे म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाला प्राणवायू उपलब्ध करून देण्याचे पुण्य कार्य आहे. जगतगुरू तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपल्याला चांगले कार्य म्हणजे संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी करायचे असा संदेश मिळतो. महाराज सांगतात ही माझी हद्द आहे, हा माझा बगीचा आहे, माझा डोंगर आहे असा भेद करू नका.मानवाने, वैष्णवाने चांगले  कर्म करणे हा वैष्णवांचा स्वभाव धर्म. यात भेदाभेद, तुझे माझे नको. सत्कर्माचा सुगंध हा सर्वांनाच मिळणार एवढे हे उदात्त विचार आहेत.

पर्यावरण जनाचे,पर्यावरण मनाचे!
पर्यावरण नभोमंडळाचे, हीतकारी !!

लेखक : चंद्रकांत शहासने. पुणे.
 संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार(कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत पर्यावरण दिन ५ जूनपासून वन हुतात्मादिन ११सप्टेंबरपर्यंत  असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान)
close