संरपच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य - जिल्हा अध्यक्ष अनिल शेडाळ..
नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
संरपच सेवा महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अनिल शेडाळे यांनी आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांना निवेदन द्वारे उपोषण आंदोलन साठी पाठिंबा देण्यासाठी विनंती केली आहे. निवेदन म्हटल्याप्रमाणे संरपच सेवा महासंघ हि संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. संरपच सेवा महासंघ मागण्या मान्य करण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलनास उपोषणास पाठिंबा द्यावा या मागणीचे निवेदन
हि संघटना संरपच उपसरपंच राळेगणसिद्धी या ठिकाणी जाऊन समक्ष चर्चा भेट घेऊन लेखी निवेदन द्वारे आण्णा मागणी केली आहे. संरपच सेवा महासंघ संरपच उपसरपंच सदस्य यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हि संघटना कार्य करते. संरपच ना शासकीय पातळीवर नियम अडी-अडचणी विकास कामांचे जाचक अटी अशा प्रशासकीय प्रश्नः संदर्भात जे काही सामाजिक प्रश्नाचच्या अडचणी येतील त्यावेळी आंदोलन करण्याची वेळ गरज असेल त्या वेळी आपण जेष्ठ समाजसेवक या नात्याने आम्हाला पाठिंबा सहकार्य करावे अशी मागणी संरपच सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष अनिल शेडाळे यांनी निवेदनाद्वारे पद्मश्री आण्णा हजारे यांना विनंती केली आहे.




