प्रतिनिधी :आसावरी वायकर
शेवगाव (दि . 17 ) ग्रामीण रुग्णालय शेवगाव या ठिकाणी उद्या दि .17 रोजी 18 वर्ष वयापुढील सर्व नागरिकांसाठी( 18-44 वर्ष आणि 45 वर्ष वरील) COVACCINE या लसीचा दुसरा डोस (फक्त दुसरा डोस) देण्यात येईल.
टोकन वाटप सकाळी आठ वाजता चालू होईल.
उपस्थित असणाऱ्या व्यक्तीलाच टोकन दिले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
ज्यांना टोकण मिळाले त्या सर्वांना RTPCR टेस्ट करणे बंधनकारक आहे.
शेवगाव साठी 100 डोस उपलब्ध झाले आहेत .
तरी इतर नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन शेवगाव ग्रामीण रुग्णालय मार्फत करण्यात आले आहे.


