अ .नगर (दि .१६ ) : मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते ई- गृहप्रवेश कार्यक्रम दिनांक 15/06/2021 रोजी दु. 4.30 वा. एन. आय. सी. वेबकास्ट व फेसबुक लाईव्ह व्दारे आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमामध्ये दि.20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत महाआवास अभियान मध्ये घरकुले पुर्ण करणा-या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई, शबरी व पारधी आवास योजना मधील घरकुल लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरुपात घरकुलाची किल्ली देण्याचा कार्यक्रम राज्य स्तरावरुन आयोजित करण्यात आला होता.
अहमदनगर जिल्हयामध्ये कार्यक्रमाचे आयोजन मा. जिल्हाधिकारी महोदय, जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर येथे 15/06/2021 दु. 4.30 वा. एन. आय. सी. वेबकास्ट व्दारे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी मा. ना. सौ. राजश्रीताई घुले पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद, अहमदनगर, मा. श्री. प्रताप पाटील शेळके, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद अहमदनगर, मा. श्री. राजेंद्र कुमार भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर, मा. श्री. राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर, श्री. सुनीलकुमार पठारे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अहमदनगर यांचे उपस्थितीत पार पडला.
श्री. किरण साळवे, श्री. संतोष भराट, श्री. आदित्य अमृत, श्री. रविंद्र वायकर, श्री. सोमनाथ ढवळे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नगर तालुक्यातील ग्रा.प .विळद येथील श्री. बापु गोपीनाथ निकम व श्रीम. सुनिता निकम प्रधानमंत्री आवास योजना ग्राप, कापूरवाडी येथील श्री संतोष भिंगारदिवे व श्री लक्ष्मण साळवे- रमाई आ योजना, ग्रा.प .खारे कर्जुने येथील श्री. संदिप भाऊसाहेब गायकवाड, श्री. हरीभाऊ सुखदेव गायकवाड, श्रीम. सारीका नानासाहेब बड़े शबरी आवास योजना, ग्रा.पं. भोरवाडी येथील श्री. जयपाल संजय काळे- शबरी आवास योजना, ग्रा.पं. घोसपुरी येथील श्री. शिवदास रामदास भोसले, ग्रा.पं. वाळकी येथील रणसिंग वसंत चव्हाण पारधी आवास योजना यांना प्रातिनिधीक स्वरुपात घरकुलाची किल्ली देण्यात आली.



