shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या चर्चेला पूर्णविराम... गुलालाने माखलेले चेहरे धुतले..!!

शिर्डी : राज्य सरकारकडून साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीची घोषणा होण्याच्या आतच समाज माध्यमावर साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. 

विशेष म्हणजे या दोन याद्या समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच पंचाईत झालेली आहे. साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाची यादी रात्री उशिरा एक व सकाळी एक प्रसिध्द झाली. या यादीत निवड झालेल्या विश्वस्तांचे कार्यकर्त्यांनी ठिक-ठिकाणी फ्लेक्स लावून अभिनंदन केले. तर काहींनी समाज माध्यमावर अभिनंदनाचा धडाका लावला होता. जिल्ह्यात काही ठिकाणी फटाके फोडून गुलालही उधळला होता. मात्र आज हा गुलाल आता धुण्याची वेळ अनेकांवर आलेली आहे. 





महाविकास आघाडीच्या नेत्यांची महामंडळ वाटपासंदर्भातील बैठक नुकतची पार पडली. यामध्ये साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर पंढरपूरचे अध्यक्षपद काॅंग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांसह विश्वस्त मंडळावर चर्चा झालेली आहे की नाही याबाबत कुठलाच खुलासा सरकारकडून झालेला नाही. 

मात्र समाज माध्यमावर विश्वस्त मंडळाची यादी रात्री उशिरा फिरविण्यात आली. ही यादी समाजमाध्यमावर आल्यानंतर अनेकांनी आपल्या नेत्याचे अभिनंदन समाज माध्यमाबरोबर फ्लेक्स लावून करण्यास सुरवात केली. काही ठिकाणी तर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊन गुलालाची उधळण ही करण्यात आलेली आहे. मात्र त्यानंतर सकाळी विश्स्त मंडळाची दुसरी यादी समाजमाध्यमावर फिरवण्यात आली. 

रात्रीच्या यादीत असलेल्यांची नावे सकाळच्या यादीत नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे अनेकांना रात्रीचा गुलाने माखलेले चेहरा धुण्याची वेळ आलेली आहे. 

सरकारकडून विश्वस्त मंडळाची निवड न होताच यादी नेमकी कशी व्हायरल झाली असा प्रश्न सध्या जिल्ह्यातील जनतेला पडलेला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील दक्षिण भागातील एकाचाही या यादीत समावेश नसल्याने दक्षिणेतून या विषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. 

 सरकारने न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी दोन आठवड्यांचा अवधी मिळालेला आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळाच्या निवडीला तुर्त तरी पूर्णविराम मिळाला आहे.

close