गणपती फार्मसीमध्ये अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध.
शंकर नागणे, टेंभुर्णी (प्रतिनिधी)
-शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान औषध निर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी एमएचटी-सीईटी २०२१ ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे सदरील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. अशी सूचना राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य, मुंबईचे आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी यांनी संकेतस्थळावरून कळवले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी २०२१ ही परीक्षा देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्याकरता मंगळवार दि. ८ जून २०२१ बुधवार दि.७ जुलै २०२१ (रात्री ११.५९) पर्यंत तर विलंब शुल्कासह अर्जाची नोंदणी करण्याकरता गुरुवार दि.८ जुलै २०२१ ते गुरुवार दि. १५ जुलै २०२१(रात्री ११:५९) असा कालावधी दिला आहे. सदरील परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सर्व संबंधित विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी. विद्यार्थ्याकडून या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यात बर्याचदा चुका होत असतात आणि धावपळ ही होत असते त्यादृष्टीने गणपती फार्मसीने एमएचटी-सीईटी २०२१ ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाची संबंधित कागदपत्रे ओळखपत्र/आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे शुल्क भरण्यासाठी एटीएम सोबत आणणे आवश्यक आहे. एमएचटी-सीईटी २०२१ संदर्भात व फार्मसी प्रतिसंदर्भात अधिक माहितीसाठी गणपती फार्मसीचे प्रा. प्रशांत मिसाळ सर (मोबा क्र. ९९६०१२५५८८) व प्रा. धनाजी माने (मोबा क्र. ९१७५४३९८४७) संपर्क साधण्याचे आवाहन गणपती फार्मसी चे सचिव डॉ.आर.डी बेंदगुडे यांनी केले. त्यावेळी अध्यक्ष विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ.रूपाली बेंदगुडे उपस्थित होत्या.

