shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महिलेने केली होती ४ वर्षापूर्वी आत्महत्या..!!

तब्बल ४ वर्षानंतर गुन्हा दाखल..!!

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : (दि . १२ ) : पाईपलाईन रोडवरील पद्मानगर येथील सुनिता पालवे (वय ३२ ) या महिलेने राहत्याघरी आत्महत्या केली होती . या घटनेचा गुन्हा तब्बल ४ वर्षानंतर दाखल करण्यात आला आहे .
 
या घटनेच्या मिळालेल्या माहितीनुसार सदर महिलने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती . तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल तिचे आईवडिल इतर अन्य नातेवाईक तसेच इतर कोणीही समोर आले नाही .

परंतु कमरेला मिळालेल्या आणि महिलेने मरण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचे अवलोकन केले असता त्यात मयत महिलेने तिचा नवरा अमित पालवे ,सासरा पोपट पालवे सासु छाया पालवे, दीर अजित पालवे, अरविंद पालवे या तिच्या सासरच्या नातेवाईकांनी तिला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केलेले आहे. दिर्घ कालावधीनंतर अकस्मात मयताचे तपासाचे कागदपत्रांचे अवलोकन करून उशिरा का होईना गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पो .उपअधिक्षक विशाल ढुमे, पो. नि . एस .पी . गायकवाड, पो.स.ई. सुरज मेढे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली .

 सहा .पो.नि. रविंद्र पिंगळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या घटनेचा पुढील तपास सहा . पो. नि . किरण सुरसे हे करत आहेत.
close