shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सिना नदीला जुन महिन्याच्या आधीच पाणी येण्याची घटना दहा वर्षांत पहिल्यांदाच घडली आहे...!

मान्सुन पुर्व पावसाच्या सरी तिनं दिवसापासुन  बरसतच आहे.     
नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):

मान्सुन पुर्व पाऊस आल्याने बळीराजा सुखावला आहे. तसेच आपल्या अहमदनगर शहराची ओळख असलेली सिना नदीचा उगम हा जेऊर येथील ससेवाडी डोंगरात एक महादेव मंदिर आहे. आणि याच ठिकाणी गाय मुख आहे.येथुनच सिना नदीचा उगमस्थान आहे.या ठिकाणावरून नदी प्रवाह सुरू होतो. नदीचे सिना नामकरण कसे झाले यांचा एक दाखला दिला जातो.  पुरातन काळातील सिना नदीची बाबत आख्यायिका अशी आहे की रामायणा काळात प्रभु श्री रामचंद्र वनवसात असताना प्रवास करून थकले होते.आणि या नदीवर त्यांनी स्नान केले. स्नान केल्यानंतर नंतर  प्रभु श्रीरामांनी  उद्गार काढले की सिन गेला त्यावरून सिना नदी असे नाव पडले अशी अख्यायिका आहे.


सिनानदी भिमा नदीची एक उपनदी आहे.त्यांचे मुख्य दोन मुख्य स्त्रोत आहे एक जामगाव जवळपास २०.किमी.अहमदनगर शहरा पासुन  जेऊर (ससेवाडी) १६.किमी अंतरावर आहे. त्यांच्या ईशान्य दिशेने सुमारे ५५ किमी  अंतरासाठी साधारणपणे नदी एक बाजु अहमदनगर जिल्हाची आणि नदीच्या दुसऱ्या काठाचा भागा बिड जिल्हाची सिमा बनवते तसेच नदी उजवी कडे मेहकरी पाणी प्राप्त करते. 

नगर शहरातुन ती बुरडगाव वाळुंज ,शिराढोण,दहिगाव,साकत खुर्द , वाटेफळ,रुईछत्तीसी अशी पुढे पुढे निमगाव गांगुर्डे धरणात जाऊन मिळते. धरणातुन शेवटी कर्नाटक राज्य सीमीवर भिमानदी मध्ये सामील होते. नगर शहरात व परिसरात गेल्या दोन तिन दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्याने सिना नदीला पहिल्याच पाऊसात पाणी वाहते झाले आहे.

आज वाटेफळ गावातु हे पाणी रुईछत्तीसी हद्दीत प्रवेश केला आहे.लवकर रूईछत्तीसी हद्दीतून पुढं जाईल पावसाळा सुरू होण्यापूर्वी  सिना पाणी पाहून नदीकाठच्या शेतकऱ्यांना खुप आनंद झाला आहे. जुन महिन्यांचं आधी पाणी येण्याची हि घटना‌ दहा वर्षा नंतर घडली आहे.असे पंचक्रोशीतील शेतकरी सांगत आहे. आषाढी कार्तिकी पायी दिंडी स़ोहळा संपत आल्यावर कधी पाणी यांयचे पण या वर्षी जुन महिना सुरू होण्यापूर्वी ‌सिना नदीला पाणी आले आहे.असे सिना नदी काठच्या जमीनधारक शेतकरी सांगत आहे.

यंदा लवकरच सिना नदीला पाणी आल्याने आता घास,मका,मुग कपाशी, फळबाग, ऊस, गवत लागवड करता येऊ शकते,शेतीला जोड धंदा दुधव्यवसाय असल्यामुळे गाया साठी चारा विकत घेऊन तो घालणे अश्यक होते.दुधाचे भाव अठरा ते विस रुपये प्रति लिटर विक्री होत आहे.आणि दुध उत्पादन खर्च  पंचवीस रुपये आसपास जात आहे.मग हा मेळ कुठे जुळत नाही.हा व्यवसाय तोट्यात चालु आहे.शासनाने अनुदान माध्यमातून मदत करावी अशी अपेक्षा आहे.

शेतकरी महेश म्हस्के उपसरपंच दहिगाव..!
close