येवला । प्रतिनिधी(संतोष राऊळ) दि -31 :
येवला तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आपल्या गुणवत्तेचा दबदबा असणाऱ्या श्री गुरुदेव प्रसारक मंडळाचे स्वामी मुक्तानंद विद्यालयातील प्राचार्य श्री.नाकील ए. जी. व उपप्राचार्या सौ.निकम एल. एस. यांना आज दि. 31 मे रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल विद्यालयात निरोप देण्यात आला.
यावेळी विद्यालयात आयोजित निरोप समारंभासाठी अध्यक्षस्थान विद्यालयाचे सचिव श्री. दिपकभाऊ गायकवाड यांनी भूषविले. सदर कार्यक्रमास सत्कारमूर्ती श्री. नाकील सर व सौ.निकम म्याडम सहकुटूंब उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व माता सरस्वतीचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक श्री.कुलकर्णी सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रभारी प्राचार्य श्री.पहिलवान एम.एस.यांनी सत्कारमूर्तींच्या आयुष्यातील केलेल्या प्रदीर्घ सेवेतील आठवणींना उजाळा दिला. तसेच विद्यालयाचे अध्यक्ष व सचिव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वामी मुक्तानंद या शिक्षकांच्या पतसंस्थे तर्फे सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
श्री. नाकील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भावुक होऊन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आयुष्यभर विद्यालयासाठी निःस्वार्थपणे कार्य केले याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगितले. तर सौ. निकम म्याडम यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये कविता सादर करून आपले विचार प्रकट केले. यावेळी व्यासपिठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. पहिलवान ए. एस.,सचिव दिपकभाऊ गायकवाड, संचालक श्री. संजयजी नागडेकर , प्रभारी प्राचार्य श्री. पहिलवान एम. एस.,विद्यालयाचे शिक्षणमंत्री श्री. चिंचले आर. आर.,विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.गोस्वामी,बोकटे विद्यालयाचे प्राचार्य श्री.पैठणकर, इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य श्री.पानपाटिल,प्राथमिक विभागाचे प्राचार्य श्री.जाधव, पर्यवेक्षक श्री.धिवर व माजी प्राचार्य श्री.नागडेकर दत्तात्रय आदि मान्यवरांबरोबरच समारंभासाठी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री.धिवर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

