shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

औषध विक्रेते व त्यांच्या परीवारास कोरोना प्रतिबंधक लस प्राधान्यक्रमाने द्यावी-संघटनेची मागणी..!!

प्रमोद चौधरी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी

एरंडोल:तालुक्यात एकूण ९०औषध विक्रेते असून त्यांना व त्यांच्या परीवाराला तात्काळ कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात यावा अशी मागणी एरंडोल तालुका औषध विक्रेता संघटनेतर्फे प्रांताधिकारी विनय गोसावी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

तालुका औषध विक्रेता संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष कैलास न्याती,सचिव नितीन पाटील,खजिनदार योगेश बियाणी,किशोर भक्कड,मिनाबाई पाटील व इतर पदाधिकार्यांनी प्रांताधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी,तहसिलदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. 

कोरोना काळात सर्व औषध विक्रेत्यांनी आपले औषध विक्रीचे कर्तव्य कोरोना योद्धा म्हणून आतापर्यंत बजावले आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून औषध सेवा दिली जात आहे. डॉक्टर व नर्सेस यांच्याप्रमाणे औषधी विक्रेत्यांना फ्रंटलाईनवर राहून जबाबदारी पार पाडावी लागत आहे. 
यावेळी औषध विक्रेत्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. 

या पार्श्वभुमीवर सर्व औषध विक्रेत्यांसह त्यांच्या परीवारास युध्दपातळीवरून कोरोना लसीचा डोस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
close