shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा मध्ये कोरोना प्रादुर्भाव कमी होत असतानाच नगर तालुक्यातील दहिगाव मधुन धक्कादायक बातमी...!!

नगर प्रतिनिधी ।  (शिवा म्हस्के)
नगर तालुक्यातील दहिगावा या ठिकाणी दि.२२ रोजी एका ग्रामस्थांचा कोरोना अहवाल  पाॅझिटिव्ह आल्याने गावात खळबळ उडाली‌ होती. 





त्यांमुळे तातडीने उपाययोजना म्हणून रुईछत्तीसी येथील  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी सविता ससाणे, यांच्याशी  संपर्क करून सदर  घटनेची कल्पना दिली.या घटने‌चे गांभिर्याने लक्षात रूईछत्तीसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय टिम दि.२३रोजी  सकाळी ११.वाजता ‌दहिगाव येथील पाटील वस्ती वर येऊन कोरोना तपासणी कँम्प आयोजित केलेल्याने संबंधित ‌बांधीत व्यक्तीच्या स़़ंपर्कातील  ३१ व्यक्तीची तपासणी करण्यात आली त्यांत दहिगाव येथील एक व्यक्तीचा अहवाल कोरोना  बांधीत आला आहे. 

दहिगाव मध्ये आजच्या स्थितीला  एकुण कोरोना बांधीत संख्या २ झाली आहे. या वेळी आष्टी तालुक्यातील हातावळण या गावातील ३ व्यक्ती कोरोना बांधीत आढळून आले आज‌ कॅम्प मध्ये ३१ पैकी ४ व्यक्ती कोरोना बांधीत आढळून आले आहे. या बांधीत व्यक्तीना पुढील उपचारासाठी ‌शासकिय कोंविड सेंटरला दाखल करण्यात आले आहे.‌ 

कोरोना तपासणी कँम्प यशस्वीतेसाठी भरत म्हस्के, डॉ. अनिकेत यादव .परिचारीका मनिषा बनसोड,भालसिंग, समुदाय आरोग अधिकारी मनिष हिवाळे, सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के आदी परिश्रम घेतले.
close