################
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :- आज केज विश्रामगृह येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची सभासद बांधणी व नवीन सदस्य नोंदणी करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरील बैठकीला मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत केज उपविभागीय अध्यक्ष पदी केज येथील शिवाजी घुले यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली
रविवार दि.13 जून 2021 रोजी सकाळी 10:00 वा.शासकीय विश्नामगृह केज येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे होते सदरील बैठकीत पुढील प्रमाणे विषय घेण्यात आले होते.
*1. केंद्रीय उपाध्यक्ष औरंगाबाद परिक्षेत्र व लातूर परिमंडळ नुतन कार्यकारिणी यांचा सत्कार समारंभ
*2. 26 जून 2021 रोजीच्या आंदोलनाची पुर्व तयारी व चर्चा
*3.औरंगाबाद येथील नियोजित अधिवेशन 2021 सहयोग निधी जमा करणे
*4.केज उपविभाग येथील 2021 ची नुतन कार्यकारिणीची निवड
*5.नवीन सभासद नोंदणी करणे
केज,अंबेजोगाई, बीड सभासद पदाधिकारी मोठ्या संख्येने सदरील बैठकीत उपस्थित होते.
आयोजक म्हणून शिवाजी घुले,राजेंद्र सोनवणे, कावळे, नखाते, मसुद शेख,विकास शिंदे, विष्णू तेलंग, संतोष राख,आर एन पवार व सर्व सभासद पदाधिकारी केज यांनी काम पाहिले.
यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष नवनाथ पोटभरे, लातूर झोन अध्यक्ष आर. एस. गायकवाड, कोषाध्यक्ष विष्णू तेलंग, बीड सर्कल अध्यक्ष कल्याण मस्के, विभागीय अध्यक्ष बी. आर. जाधव, उपाध्यक्ष दयानंद कावळे व सर्व पदाधिकारी सदस्यांची उपस्थिती होती
नुतन तालुका अध्यक्ष शिवाजी ज्ञानोबा घुले, उपाध्यक्ष रोमन डिकले व कार्यकारिणीचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार प्रकाश मुंडे, विजयराज आरकडे , माजी नगरसेवक शिवाजी हजारे , सुरेश घुले व अशोक तांदळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती*.

