*🕉️ सुदिन ।।*
*आजचे पंचांग*
*शुक्रवार, जून २५, २०२१*
*युगाब्द : ५१२३*
*भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आषाढ ४, शके १९४३*
*सूर्योदय : ०६:००*
*सूर्यास्त : १९:१५*
*चंद्रोदय : २०:०५*
*चंद्रास्त: ०६:१६*
*शक सम्वत : १९४३ प्लव*
*चंद्र माह :ज्येष्ठ*
*पक्ष : कृष्ण पक्ष*
*तिथि : प्रतिपदा - २०:५९ पर्यंत*
*नक्षत्र : मूळ - ०६:४० पर्यंत*
*क्षय नक्षत्र : पूर्वाषाढा - ०४:२५, जून २६ पर्यंत*
*योग : ब्रह्म - २२:३८ पर्यंत*
*करण : बालव - १०:३१ पर्यंत*
*द्वितीय करण : कौलव - २०:५९ पर्यंत*
*सूर्य राशि : मिथुन*
*चंद्र राशि : धनु*
*राहुकाल : १०:५८ ते १२:३७*
*गुलिक काल : ०७:३९ ते ०९:१९*
*यमगण्ड : १५:५६ ते १७:३५*
*अभिजित मुहूर्त : १२:११ ते १३:०४*
*दुर्मुहूर्त : ०८:३९ ते ०९:३२*
*दुर्मुहूर्त : १३:०४ ते १३:५७*
*अमृत काल : ००:०४, जून २६ ते ०१:३१, जून २६*
*वर्ज्य : १५:२२ ते १६:४९*
*आज जागतिक कोड त्वचारोग दिन आहे*
*आज आंतरराष्ट्रीय दर्यावर्दी दिवस आहे*
*संतांची पावनभूमी म्हणून ओळखल्या जाणा-या महाराष्ट्रात अनेक संत माहात्मे होऊन गेले, त्यापैकीच एक अलौकिक संत व थोर स्वातंत्र्यसेनानी सदगुरू योगीराज श्री श्रीपाद दत्तात्रय तथा मामासाहेब देशपांडे हे होत.*
*समाज कार्यासाठी आधी भगवंतांचे अधिष्ठान हवे. स्वत: आत्मज्ञान प्राप्त करून ते ज्ञान इतरांना दिले पाहिजे, या पार्वतीमातेंच्या सांगण्यावरून त्यांनी अध्यात्ममार्गावर लक्ष केंद्रित केले. आईच्या सांगण्यावरून श्रीपादांनी दासबोध, श्री एकनाथी भागवत व नंतर ज्ञानेश्वरी या क्रमाने पारमार्थिक अभ्यास केला. ज्ञानेश्वरी हा नुसता पारायणाचा ग्रंथ नाही तर त्यातील ओवी जगता आली पाहिजे. देहाची तीन चिमटय़ा राख होईपर्यंत नेमाने व प्रेमाने, न चुकता साधना करीत राहायची, असे पार्वतीदेवी सांगत असत.*
*प. पू. मामांनी १५ जून १९४८ रोजी श्री स्वामी समर्थांच्या अनुज्ञेने एक तांब्या व दोन पंचे घेऊन गृहत्याग केला. आळंदी, पंढरपूर, द्वारका येथे यात्रा करून ते राजकोटला आले. तेथे हठयोग, अष्टांगयोग वगैरेचा अभ्यास केला. ध्यान-ध्यारणा, योगासने यामध्ये ते वेळ घालवू लागले. पंढरीची आषाढीवारीसुद्धा केली. या सर्व यात्रांमध्ये त्यांना अनेक दिव्य अनुभव आले.*
*१९५३ च्या रामनवमीला राजकोट येथील राममंदिरात अचानक पहिले प्रवचन करण्याचा योग प.पू. मामांना आला व त्यानंतर हयातभर त्यांनी ही ज्ञानसत्रे करून लोकांना ज्ञानेश्वरीची व संतवाङ्मयाची गोडी लावली. प. पू. मामांनी १९३६चे १९४८ अशी सलग १२ वर्षे पंढरीची वारी केली. पुढे ३२ वर्षे देशमुख महाराजांच्या दिंडीतून पायी वारी केली.*
*प. पू. टेंब्येस्वामी महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितल्याप्रमाणे प. पू. श्री गुळवणी महाराजांनी पू. मामांना कुरवपूरला तपश्चार्येसाठी जाण्याची आज्ञा केली. दोन महिन्यांच्या तेथील वास्तव्यात प. पू. श्री टेंब्येस्वामी महाराजांचे दोनदा दर्शन झाले.* *श्रीगुरूव्दादशीच्या शुभदिनी गुरुचरित्राच्या पोथीत, नवव्या अध्यायातील भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या निजानंदगमनाच्या ओव्यांवरच बिल्वदलयुक्त दिव्य पादुका प्रसादरूपाने मिळाल्या. कुरवपूरहून अष्टविनायक, काशी, गया, प्रयाग, जगन्नाथपुरी या ठिकाणी यात्रा करीत पुण्याला परत आल्यावर प.पू.श्री गुळवणी महाराजांनी त्यांना आणखी १२ वर्षे प्रसाद-वार्ता गुप्त ठेवून साधनेवर अधिक भर देण्यास सांगितले.*
*त्यांनी १९७३ मध्ये संप्रदाय सेवाकार्यासाठी स्वतंत्र पीठ स्थापन करावे या प.पू. श्री गुळवणी महाराजांच्या आज्ञेनुसार सिंहगड रस्त्यावरील हिंगंणे खुर्द येथे माऊली आश्रमाची स्थापना केली.* *प.पू.मामांचा शक्तिपात योग संप्रदायाच्या सर्व १६४ प्रकारांचा सखोल अभ्यास व अधिकार होता. पुढे प.पू. मामांनी श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने कोयनानगरजवळील हेळवाक या गावी डोंगरावर भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली. या समारंभानंतर मात्र प.पू.मामा निरवानिरवीची भाषा बोलू लागले. मंगळवार २१ मार्च १९९० रोजी त्यांनी योगमार्गाने देह सोडला.*
*१९१४ : अलौकिक संत व थोर स्वातंत्र्यसेनानी सदगुरू योगीराज श्री श्रीपाद दत्तात्रय तथा मामासाहेब देशपांडे यांचा जन्म दिवस (देहत्याग : २१ मार्च, १९९०)*
*तुम मुझे क्या खरीदोगे, मैं बिल्कुल मुफ्त हूँ - विश्वनाथ प्रताप सिंग (काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना व्यक्त केलेले मनोगत)*
*| राजा नहीं फकीर है | देश की तकदीर है |*
*विश्वनाथ प्रताप सिंह भारताचे आठवे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचे शासन एक वर्षाहूनही कमी काळ चालले, २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० पर्यंत.*
*राजीव गांधी सरकार बरखास्त झाल्यामुळे पंतप्रधान बनलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांनी निवडणुकीच्या माध्यमातून २ डिसेंबर १९८९ रोजी हे पद प्राप्त केले होते. श्री व्ही पी सिंह अतिशय इमानदार होते आणि दलित, मागासवर्गीय आणि वंचित समुदायांबद्दल त्यांच्या मनात अतिशय कणव होती.*
*व्यक्तिगत जीवनात विश्वनाथ प्रताप सिंह अत्यंत निर्मळ स्वभावाचे होते आणि प्रधानमंत्री म्हणून त्यांची छबी एक मजबूत आणि सामाजिक राजनैतिक दूरदर्शी व्यक्तीची होती.* *त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी मान्य करून देशात वंचित समुदायाच्या सत्तेतील अधिकारावर शिक्कामोर्तब केले.*
*२७ नोव्हेंबर २००८ रोजी दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटल मध्ये वयाच्या ७७ व्या वर्षी व्ही पी सिंह यांचा मृत्यू झाला.*
*१९३१ : भारतीय पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा जन्म. (मृत्यू : २७ नोव्हेंबर २००८)*
*घटना :*
*१९१८ : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला.*
*१९३४ : महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्न झाला.*
*१९४० : दुसरे महायुद्ध: फ्रांसने औपचारिकरित्या जर्मनीला आत्मसमर्पण केले.*
*१९७५ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर केली.*
*१९७५ : मोझांबिकला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले.*
*१९८३ : भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.*
*१९९३ : किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.*
*२००० : मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले.*
*• मृत्यू :*
*• १९२२ : बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन.*
*• २००० : मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे यांचे निधन.*
*• २०१९ : गोवा मुक्तिसंग्रामातील अग्रणी ‘पद्मश्री’ मोहनजी रानडे यांचे निधन (जन्म : २५ डिसेंबर १९३०)*
*जन्म :*
*१९१५ : भारतीय लष्करी सल्लागार काश्मीर सिंग कटोच यांचा जन्म.*
*१९२४ : संगीतकार मदन मोहन यांचा जन्म. (मृत्यू : १४ जुलै १९७५)*
*१९७४ : हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर यांचा जन्म.*
*१९७८ : हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी यांचा जन्म*
*१९८६ : अभिनेत्री सई ताम्हनकर यांचा जन्म.*
माहितीस्तव: लोकसेवा विकास आघाडी, श्रीरामपुर

