shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवरा च्या शासकीय कोविड सेंटरला माजी राज्य मंत्र्यांकडून औषधांची मदत...!!


देवळाली प्रवरा - दि.३१ मे २१
देवळाली प्रवराच्या शासकीय कोविड सेंटरला राज्याचे माजी राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष मा. सचिन अहिर यांनी आज किमती औषधांची मदत पाठविली आहे. 

माजी राज्यमंत्री, शिवसेना उपनेते आणि राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे अध्यक्ष मा सचिन अहिर यांना देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमचे वतीने श्री दत्तात्रय कडु पाटील यांनी सहारा कोवीड सेंटरला किंमती औषधे देणेबाबत विनंती केली होती.

त्या विनंतीस मान देऊन मा अहिर साहेब व सौ  संगीता वहिनीनी त्यांचे संकल्प प्रतीष्ठान मुंबईचे माध्यमातुन देवळाली प्रवरा येथील सहारा मंगल कार्यालय येथील शासकीय मोफत कोवीड सेंटरला उपलब्ध नसलेला व जास्त किमंतीची जवळपास तीस हजार रुपये किमंतीच्या औषधाचे पहिले पार्सल पाठवुन दिले आहे. यानंतरहि त्यांनी लागतील ती  औषधे पाठवुन देण्याचे आश्वासन दिले आहे. या भरीव मदतीबद्दल मा सचिनभाऊ व सौ वहिनींचे देवळाली प्रवरा हेल्प टीमने वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी आभार मानले.
close