shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजमाता जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई यांची आज पुण्यतिथी..!!


प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : ( दि .१७ ) :थोर तुमचे कर्म उपकार कधी ना फिटणार चंद्रसूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार.
  
राजमाता जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई आज या दोन्ही पराक्रमी महिलांची पुण्यतिथी . त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच आज आमचे सामाजिक कार्य चालू आहे. या कार्याची माहिती सामान्यांपर्यंत सेवेद्वारे जाण्यासाठी आज 'एकत्वम फाउंडेशन 'आपल्या सेवेत ही संस्था उभारत आहे.
      
आपली भारत भूमि पवित्र मानली जाते अनेक शूर पराक्रमी आणि झुंजार योद्धे या भूमीत जन्माला आले या शूर वीरांना मध्ये दोन अशा पराक्रमी स्त्रिया होऊन गेलेल्या ज्यांनी आपल्या साम्राज्याला वाचवले.
  
  
राजमाता जिजाऊ आणि राणी लक्ष्मी यांच्यातील साम्य म्हणजे त्यांच्यातील करारीपणा पराक्रमीपणा.
जिजाऊंनी कुशल सहकार्‍यांसोबत पुणे शहराचा पुनर्विकास केला शिवबाला घडवताना ऐतिहासिक कथा बरोबरच राज्यकारभाराची उत्कृष्ट हाताळणी व व्यवस्थापन इत्यादी सर्व गोष्टी संस्कार करतानाच दिल्या. काळाप्रमाणे नवनवीन संकल्प व सहकार या दोन गोष्टी मात्र जिजाऊ पद्धतशीरपणे हाताळत होत्या. सर्वधर्मसमभाव, जनतेची सेवा व त्यांचे प्रश्न सोडवणे याचे धडे मात्र आम्ही महिला जिजाऊ कडूनच आत्मसात करीत आहोत.
   
माता जिजाऊ आणि राणी लक्ष्मीबाई दोघीही घोडेस्वारी तरबेज होत्या याशिवाय शस्त्रास्त्र अभ्यास बुद्धी विकास असे धडेही राजमाता आणि राणी ने आपल्या सहकाऱ्यांना दिले. खरोखर आज आम्हाला यातूनच प्रेरणा मिळते आहे फक्त प्रेरणाच नाहीतर आमच्या महिलांच्या मनात साहस आणि ऊर्जेचा संचार या गोष्टी आज जगण्याचे बळ निश्चितच देत आहेत आजही आम्ही अभिमानाने यांच्या पराक्रमाची विजय गाथा  सुवर्णाक्षरांनी आमच्या मनात कोरून ठेवली आहे.
    
या दोन्ही पराक्रमी महिलांना पुनश्च एकवार अभिवादन करून सामाजिक कार्यामध्ये एकत्वम फौंडेशन झोकून देत आहे . या फाउंडेशन ला आपणा सर्वांचे आशीर्वाद यासोबत सामाजिक कार्यात आपलाही सहभाग निश्चित असावा .
   
अनुरिता झगडे, एकत्वम फाऊंडेशन
close