shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा आरक्षण रद्द झाल्याने दाखल्यांच्या येणाऱ्या अडचणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन..!!

प्रतिनिधी : आसावरी वायकर

कोल्हापूर : (दि .२३) मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस दाखले काढायला लागणार आहेत . हे दाखले काढत असताना येणाऱ्या त्रुटी व अडचणी यांबद्दल राजे समरजित सिंह घाटगे  यांच्या नेतृत्वाखाली मराठा ऑर्गनायझेशन कोल्हापूर यांच्या वतीने जिल्हाधिकारी माननीय दौलत देसाई साहेब यांना निवेदन देण्यात आले.

दौलत देसाई

यावेळी ईडब्ल्यूएस दाखले प्रवेशानंतर सहा महिन्यांपर्यंत जमा करण्याची मुभा याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एकाच किमतीत ईडब्ल्यूएस दाखले मिळावेत यासाठी निवेदन देण्यात आले. 

यावेळी ऋतुराज माने ,राजवर्धन बिरंजे, मंदार पाटील, अभिजित राऊत, अभिजीत पोर्लेकर, प्रथमेश देसाई, धनराज माने, श्लोक चिंचवाडे, समर्थ शिंगारे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते

close