प्रतिनिधी : संजय वायकर
औरंगाबाद : (दि.१) :जागतिक कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या निराधार गरजूंसाठी बुधभुषण फाऊंडेशन च्या औरंगाबाद शाखे मार्फत वाळुंज , पंढरपूर येथे सदस्य दुर्गेश राठोड , गणेश राठोड यांनी गरजवंतांना अन्नधान्य वाटप केले .
यावेळी तृप्ती राठोड , नम्रता राठोड यांनी सहकार्य केले .
जीवनावश्यक वस्तूंचे लाभार्थी गोसावी यांनी सांगितले की , या मिळालेल्या वस्तुंमुळे त्यांना खुप मोठा आधार मिळाला आहे . या लॉकडाऊन मुळे त्यांचे काम बंद झाले आहे . आणि अशा या संकट काळात बुधभुषण फाऊंडेशन ने खुप मोलाची मदत केली आहे .
बुधभूषण फाउंडेशन चे चेअरमन अमोल दुरंदे , सचिव रुपेश लाटे , संस्थेचे विश्वस्थ विशाल जकातदार, तसेच वैभव शिंदे, अनिल गोडगे , सुखदेव शिंदे ,विकास राठोड , ज्ञानेश्वर शिंदे ,सुधाकर खळदकर हे या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेत आहेत .

