shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुरुपौर्णिमेनिमित्त येवला येथे राऊळ समाज युवक संघटनेच्या वतीने 10वी उत्तीर्ण विधार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला..!!

येवला । प्रतिनिधी- दि. 23:  गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून येवले शहरातील श्रीगोरक्षनाथ मंदिर येथे राऊळ समाज युवक संघटनेच्या वतीने 10 उत्तीर्ण झालेल्या विधार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. 

यावेळी सकाळी गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना युवक संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह व पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच समाजातील शिक्षक संतोष राऊळ सर यांना शाल श्रीफळ देऊन यांचा देखील सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमास जगदीश वैद्य यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समाजबांधवांचे स्वागत केले. मुकुंद पवार यांनी गुरूंचे आयुष्यात असलेले महत्व आपल्या शब्दात सांगितले. तर संतोष मोडवे यांनी आभार प्रदर्शन केले. समाजातील जेष्ठ व्यक्तींनी विद्यार्थ्यांना शिक्षक व शिक्षणाचे महत्व पटवून देत भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

सदर कार्यक्रमास राऊळ  समाजाचे उपाध्यक्ष अंबादास राऊळ, खजिनदार बळीराम भालारे व सदस्य संजय राऊळ,दत्तात्रय राऊळ,कैलास राऊळ आणि जेष्ठ बाळनाथ भालारे उपास्थित होते.तर युवकांमध्ये शिवाजी राऊळ, अतुल भालारे, राकेश राऊळ, दिपक राऊळ,शरद राऊळ, आप्पा राऊळ, अर्जुन राऊळ,नचिकेत राऊळ, सागर राऊळ, सचिन राऊळ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राऊळ समाज युवक संघटनेच्या युवकांनी अथक परिश्रम घेतले.
close