जन आधार संघटनेने प्रशासन व डोळस कुटुंबीयांशी सुंसंवाद साधुन समन्वयाने मार्ग काढला...!
नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
नगर तालुक्यातील नगर मनमाड हायवे रस्ता लगत असणारे गाव शिंगवे नाईक ग्रामपंचायत कार्यालय कडे डोळस कुटुंब लोकशाही मार्गाने रितसर लेखी तक्रार अर्जद्वारे, निवेदनाद्वारे दोन वर्षांपासून वहिवाट रस्ता मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू होता.
पण या दोन वर्षात या विषयी कोणत्याही प्रकारची कारवाई कार्यवाही दखल न घेतल्याने डोळस कुटुंबीयांनी नोटिस द्वारे उपोषणाचा इशारा देऊन ग्रामपंचायत समोर (दि.२) जुलै पासुन आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. या घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली व सोशल मीडिया माध्यमातून संघटना, पत्रकार यांनी घटनेची खबर मिळाल्याने डोळस कुटुंबीय रस्ता मिळवण्यासाठी दोन दिवसा पासून आमरण उपोषण चालू होते.
ग्रामपंचायत प्रशासन कोणताच निर्णय घेतला जात नसल्याने डोळस कुटुंबीयांची गेल्या दोन वर्षांपासून दिशाभूल माहिती व उपोषणा पासून परावृत्त व्हावे हे कागदोपत्री नाममात्र पत्र देण्यात आले होते.पण यावर प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याचे पाहून हाताश डोळस कुटुंबीयांनी. उपोषण स्थळी आत्मदहनाचा इशारा दिला होता. या घटनेची दखल घेत जन आधार संघटना सदर घटनास्थळी जाऊन वस्तुस्थिती पाहणी सदर हकीकत पाहून डोळस कुटुंबीयांनी सर्व पाठपुरावा दाखवला.
या विषयीचे गांभीर्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या लक्षात आले त्यांनी विलंब न करता जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून समस्या अडचणी समजून सांगितल्या या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून सदर घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. सदर घटनास्थळी वरिष्ठ अधिकारनी योग्य लेखी आदेश सर्व बाबींचा पुरतात करून कारवाई करण्याचे आदेश दिले.
इंदुमती डोळस यांचे (वय.८५) पाहता व कोरोना भयंकर आजार पाहता उपोषण करण योग्य नसल्याचे समजुन सांगितले व तुमचा पाठपुरावा जन आधार संघटना करेल असे संघटनेच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले.
आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु तुम्हाला लोकशाही मार्गाने न्याय मिळुन देऊ असे आश्वासन यावेळी देण्यात आले जन आधार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे,शहनवाज शेख, शिंगवे नाईक ग्रामविकास अधिकारी मंगेश पुंड, विस्तार अधिकारी तुपे, ग्रामपंचायत सदस्य अमोल डोळस, माजी सरपंच विश्वासराव जाधव, विद्यमान उपसरपंच सुनील जाधव, आदी मान्यवरांच्या हस्ते आमरण उपोषण सोडण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरीक उपस्थित होते.

