shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेच्यावतीने करण्यात आला सत्कार..!!

प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप
अ .नगर: (दि.६ ) अहमदनगर महानगरपालिका महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.या निवडणुकीत सौ. रोहिणीताई शेंडगे यांची महापौर पदि तर श्री गणेश भोसले साहेब यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली.
  
 
अहमदनगर जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्या वतीने आदरणीय खासदार श्री. सुजयदादा विखे-पाटील, नवनिर्वाचित महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे व उपमहापौर श्री. गणेश भोसले साहेब यांचा सत्कार  पुष्पगुच्छ व महाराष्ट्रात सर्वाधिक खप झालेले पुस्तक "बुध्दिबळ शिका व खेळा" हे  देऊन करण्यात आला.
   
अहमदनगर जिल्हा बुध्दिबळ संघटनेच्या वतीने सर्व मान्यवरांना  पुढील कार्यास मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. 


महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे यांनी लवकरच महापौर बुध्दिबळ चषक चे आयोजन करण्याचे आश्वासन अहमदनगर जिल्हा बुध्दिबळ संघटनेला दिले.

यावेळी अहमदनगर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सचिव श्री यशवंत बापट सर, विश्वस्त श्री पारुनाथ ढोकळे सर, श्री दिलीप चौधरी,पालक व खेळाडू उपस्थित होते.
close