shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने कोरोना योद्ध्यांना पुरस्कार..!

तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने कोरोना योद्ध्यांना पुरस्कार..!

इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील नीरा नदीच्या किनारी असलेले खोरोची या गावात तेज पृथ्वी ग्रुप च्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय व बहुमोल सामाजिक कार्य केल्याबद्दल कोरोना योद्ध्यांना उस्फुर्त अशी प्रेरणा मिळावी. त्यांच्या कार्याचे कौतुक करून ऋण व्यक्त करावे या उद्देशाने कोरोना युद्धांचे विशेष पुरस्कार माजी सभापती विलासराव वाघमोडे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पांडुरंगतात्या मारकड यांच्या प्रमुख उपस्थितीत व  महेंद्र रेडके यांच्या मार्गदर्शनाखाली देऊन  सन्मान( दि. २७ जुलै )रोजी करण्यात आला.
माजी सभापती विलासराव वाघमोडे यांना तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने समाज सेवक हा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
इंदापूर तालुका सरपंच  सघंटनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सजंय रूपनवर  सन्मानित करण्यात आले.

यावेळी युवा नेते डॉ. शशिकांत तरंगे, आप्पा माने तेज ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात, गणेश शिंगाडे, हनुमंत यमगर, प्रसाद पाध्ये, रुपेश शिंदे, दुर्योधन पाटील, पूजा पाध्ये, संजय चव्हाण, राजू भाळे, विनोद सावंत, राहुल शिरसागर व ग्रामस्थ उपस्थित होते.
सन्मानाला उत्तर देताना विलासराव वाघमोडे म्हणाले की ,कोरोना काळात ना केंद्र सरकार, ना राज्य सरकार काही करू शकत होते, इंदापूर तालुक्यातील पंचायत समिती, आरोग्य विभाग, पोलीस खाते आणि खास करून आज ज्यांना तेजप्रुथ्वी ग्रुपने सन्मानीत केले. असे आशा वर्कर, डॉक्टर, नर्स,शिक्षक व विविध सामजिक कार्यकर्ते  यांनी खरा कोरोनो कमी करण्यास मदत केली. आणि अश्या  घरोघरी पोचून काम करणाऱ्यांचा सन्मान तेजप्रुथ्वी ग्रुप ने करणे हे भाग्याचे काम आहे. इंदापूर तालुक्यात तेजपृथ्वी ग्रुप नेहमीच गोरगरीब जे मनापासून जनतेची सेवा करतात त्यांच्या पाठीशी उभा असतो .तेजपृथ्वी ग्रुप समाजातील तळागाळात जाऊन काम करतो. यांना पुढील कार्यास यांना हार्दिक शुभेच्छा.
 यावेळी पंचायत समिती इंदापूर चे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले की,कोरोना काळात प्रशासन तील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.शासनाचा प्रत्येक कर्मचारी आपली जबाबदारी मोठ्या धैर्याने पार पाडत होता.कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना स्वतःचा जीव वाचवून नागरीकांचे आरोग्य राखणे ही दुहेरी भुमिका प्रत्येक कर्मचाऱ्यांना बजावावी लागत होती. सध्या तालुक्यातील कोरोनाची स्थिती काहीशी ओसरली आहे,याचा अर्थ तालुक्यातून कोरोना पळाला असा होत नाही. तिसऱ्या लाटेचा उपद्रव केव्हाही होऊ शकतो. ज्या स्थितीतून आपण बाहेर पडलो आहे जो संघर्ष आपण केला तो पुन्हा टाळायचा असेल तर शासनाने घालून दिलेले निर्बंध काटेकोरपणे पाळून शासनास सहकार्य करा. तसेच तेजीपृथ्वी ग्रुप ने मागील दोन महिन्यापूर्वी इंदापूर येथे माझाही सन्मान अहिल्या रत्न पुरस्कार देऊन केला असे विजयकुमार परीट म्हणाले.
तर प्रास्ताविक भाषणात तेजप्रुथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात म्हणाले की,तेजप्रुथ्वी  ग्रुप हा शेतकरी गोरगरीब कामगार अशा लोकांना त्यांच्या अडचणी सोडवण्यास मदत करतो .खोरोची हे माझे गाव असून या ठिकाणी ज्यांनी खरोखरच मनापासून कोरोना काळात लोकांची सेवा केली. या सगळ्या लोकांचा सन्मान करणे हे माझे कर्तव्य आहे .आणि त्यासाठी आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे स्वागत करुन आभार मानतो मी  इथून पुढे खोरोची गावात किंवा इंदापूर तालुक्यात सामाजिक  कोणतेही असो तेजप्रुथ्वीग्रुप आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सामाजिक क्षेत्रात यापेक्षा जोमाने काम करेल.

या कार्यक्रमाचे आभार आर्चना गोरड यांनी मानले.

चौकट:
*तेजपृथ्वी ग्रुप व नानासाहेब खरात हे नेहमीच अडचणीच्या काळी सामान्यांच्या पाठीशी उभे- महेंद्र रेडके.* 

 तेजपृथ्वी ग्रुप व नानासाहेब खरात हे नेहमीच अडचणीच्या काळी सामान्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. खोरोची आणि परिसरातच नाहीतर संपूर्ण तालुक्यात व तालुक्या बाहेरही त्यांनी समाजकार्य केले आहे. अनाथाश्रमातील वृद्धांना खाऊ वाटप, भटक्‍या लोकांच्या पाला वरती जाऊन साडी वाटप,शासकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप, अनाथ मुलांना खाऊ व साहित्य वाटप तसेच कोरोना बाधित लोकांना त्यांनी खूप सहकार्य केले आहे. अशा या खरात कुटुंबियांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे व ते करीत असलेल्या समाज कार्यास सहकार्य करावे असे प्रतिपादन महेंद्र रेडके यांनी केले.
close