shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शुक्रवारच्या नमाज पठणवेळी पुरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन..!!

राहाता (शौकतभाई शेख ) - सध्या नियमित होत असलेल्या अतिवृष्टीमुळे देशाच्या अनेक भागात विशेष करुन राज्याच्या रत्नागिरी,रायगड,सांगली, कोल्हापूर,मिरज आदी भागात महापूराने प्रचंड प्रमाणात थैमान घातले आहे,निसर्ग कोपल्याने पुराच्या पाण्यात अनेकांचे घर दार,संसार,दुकाने अक्षरशः उध्वस्त झाले आहे,असा भयानक प्रसंग त्या परीसरातील नागरीकांवर ओढावला आहे,


यासमयी त्यांना आपल्या मदतीची नितांत गरज आहे, याकरीता कुठलाही जाती-धर्म भेदभाव न बाळगता मदतीसाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे,या संकट समयी पुरग्रस्तांना धीर देत त्यांना आवश्यक असलेले खाण्या, पिण्यांच्या सामग्रीसह अत्यावश्यक वस्तूं आणि घरांच्या पुनर्वसनकामी पुढे येणे हे आपले कर्तव्यच आहे,कारण त्यांच्यावर ओढावलेल्या अशा कटू प्रसंगा प्रसंगी आपण सर्वांनी एकत्र येत मदतीचे हात पुढे करणे नितांत गरजेचे आहे आणि हाच सर्वात मोठा माणूसकीचा धर्मही आहे, याकरीता येत्या शुक्रवारी (दिनांक ३०/०७/२०२१)  दुपारच्या जुमा नमाज पठणवेळी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच लहान- मोठ्या मशिदीमध्ये पुरग्रस्तांच्या मदतीसाठी "आर्थिक मदत अभियान"राबविले जाणार आहे, 

यामध्ये सर्व समाज बांधवांनी आपापल्यापरिने पुरग्रस्तांच्या मदतीकरीता आर्थिक योगदान द्यावे असे आवाहन अॉल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे जिल्हा समन्वयक हजरत याह्या साहब कासमी आणि जमियत उल्मा-ऐ-हिंदचे जिल्हा सेक्रेटरी मौलाना अ.रऊफ साहब आझाद यांनी केले आहे, याकरीता सर्वच समाज बांधवांनी या अभियानात भाग घेत संकटात सापडलेल्या सर्वच जाती-धर्मातील आपल्याच बांधवांच्या मदतीसाठी आवर्जून पुढे यावे असेही म्हटले

असल्याने राहाता तय्यबा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जनाब इलियास अय्युब शाह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

close