shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक समिती इंदापूरच्या नूतन कार्यकारिणीची निवड संपन्न..!


शिक्षक समिती इंदापूरच्या नूतन कार्यकारिणीची निवड संपन्न..!

शिक्षक समिती इंदापूरच्या  अध्यक्षपदी ज्ञानदेव बागल यांची सर्वानुमते फेर  निवड ..!
इंदापूर: (११ जुलै २०२१) रोजीशिक्षक समिती इंदापूर शाखेच्या  त्रेवार्षिक पदाधिकारी निवड शिक्षक सोसायटी सभागृह इंदापूर येथे खेळीमेळीच्या वातावरण एकमताने पार पडल्या. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव बागल होते.प्रसंगी मावळते सरचिटणीस सुनिल मखरे यांनी प्रास्ताविक केले 
शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन सुनिल वाघ यांनी निवडी जाहिर केल्या.अध्यक्षपदी ज्ञानदेव बागल यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.कार्याध्यक्षपदी तुकाराम ठोंबरे , कोषाध्यक्षपदी भारत ननवरे , सरचिटणीसपदी विनय मखरे , उपाध्यक्षपदी नजीर शिकिलकर , प्रवक्ते पदी संतोष हेगडे व प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ चव्हाण यांची निवड करण्यात आली.

यावेळी शिक्षक समितीची इंदापूर शाखेची महिला आघाडी देखील निवडण्यात आली.महिला आघाडी अध्यक्षा-सौ शोभा भोसले,सरचिटणीस-सौ संगीता घाडगे,कार्याध्यक्षा-सौ सुनंदा बोके, कोषाध्यक्षा-सौ रत्नमाला भोंग मॅडम यांची निवड करण्यात आली...यासह स्वतंत्र महिला कार्यकारणी निवडण्यात आली...

त्याचप्रमाणे तालुक्यातील सहा बीटचे १२ उपाध्यक्ष , ८ सहचिटणीस  , १२ नियामक मंडळ सदस्य , १० कार्यकारिणी सदस्य , १० महिला कार्यकारीणी सदस्य , ४ वस्तीशाळा प्रतिनिधी , ४० केंद्र संघटक ,  २६ महिला केंद्र संघटक अशी भरगच्च पदाधिकारी निवडी सर्वानुमते संपन्न झाल्या.

प्रसंगी नुतन पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले.अध्यक्ष ज्ञानदेव बागल , सचिन गायकवाड , सुधाकर ठाकर , जय कांबळे , बापूराव राऊत यांनी मनोगते व्यक्त केली.शिक्षक सोसायटी चेअरमन ज्ञानदेव चव्हाण , व्हा चेअरमन वसंत फलफले , माजी चेअरमन हरिश काळेल , संभाजी काळे , किरण म्हेञे , विलास शिंदे , नितिन वाघमोडे , सुभाष भिटे , सुनंदा बोके , शोभा भोसले , अरूण मिरगणे , विलास पानसरे , हनुमंत शिंदे , सुनिल शिंदे , चंद्रकांत गोरे , मगंध वणवे , सचिव संजय लोहार , प्रताप शिरसट, महावीर ठोंबरे,शफिक शेख , शिक्षक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुञसंचालन माजी सचिव छगन मुलाणी यांनी केले.आभार व्हा चेअरमन वसंत फलफले यांनी मानले.सदर निवडी कोरोनाचे नियम पाळून करण्यात आल्या.
close