shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आज आकाशाला गवसणी घालणाऱ्या आकाश आणि नेहा यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होतोय साजरा..!!


पुणे । प्रतिनिधी :- दि.९जुलै २०२१
 लग्न म्हणजे जीवनातील एक अतूट नाते, दोन जीवांचे अतुलनीय प्रेम, दोन परिवाराचे निर्मळ नाते, त्यात विश्वास हाच सर्वात महत्वाचा दुवा असतो. 

आकाश आणि नेहाचे विवाह सोहळा ‌क्षणचित्र

    पाय नसूनही गड किल्ले सर करणारा आकाश

आकाश बाबत जेवढे बोलावे आणि कौतुक करावे तेवढे कमी आहे, जन्मत: नैसर्गिकरित्या दोन्ही पाय नसताना, दोन्ही पायाचे पंजे कमरेला चिकटून असताना, त्याने घेतलेले शिक्षण आणि कर्तुत्व, धाडसी स्वभाव कारणीभूत आहे.विशेषतः संगीत क्षेत्रातील चार परीक्षा दिल्या आहेत नाटकांमध्ये अभिनय, गाण्यामध्ये कलाकौशल्य, बुद्धीबळ, कुंग फू, क्रिकेट स्पर्धा यामध्ये सुद्धा मागे नाही.
 
आकाश आणि नेहा एका निवांत क्षणी

अवघ्या 12 व्या वर्षी नाट्याशाला गौरव पुरस्कार, त्याने मिळवले आहे, त्यात मंगल पांडेचा भूमिका पाहण्यासारखे होते.गाणे गाण्यात सुद्धा अनेक प्राविण्य मिळवले आहेत, तब्बल 60 पेक्षा अधिक प्रशस्ति पत्र, पदके, वृत्तपत्र लेख कटिंग, अनेक चॅनेल्स, टी व्ही, यू ट्यूब अशा अनेक प्रसार माध्यमांनी दखल घेऊन, त्याचे अनेक मुलाखती प्रसारित झाली आहेत..!
        
आकाश व्यायाम शाळेत व्यायाम करताना

विशेषतः हाताचे पंजे वापरुन राजमाची, पर्वती, सिंहगड,  पुरंदर, शिवनेरी आदी किल्ले सर केले आहेत.

आकाश गाणे गाताना चे एक क्षणचित्र

त्याने आपले शिक्षण BCA पूर्ण केलेले असून तीन कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्स, डी आय टी, डी डब्ल्यू टी, डी सी ए पूर्ण केल्या आहेत. त्याच बरोबर मराठी व इंग्रजी टायपिंग कोर्स सुध्दा केलेला आहे, डी टी पी, टॅली, मोबाईल रिपेअर कोर्स पूर्ण केलेले आहे. विशेषतः अर्ध वेळ कामे करून, कर्ज करून सदर शिक्षण घेतले आहे. त्यामुळे जीवन जगण्यात बरेच काही आत्मविश्वास, आत्मबळ त्याला मिळत गेले, त्या बळावर ॲमेझॉन मल्टिनेशनल कंपनीत सध्या स्थित नोकरीस आहे.


आकाशचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला दोन्ही पायांचा भाग अस्तित्वात नाही. निसर्ग नियमानुसार अशा दिव्यांग मुलाने लग्न करायच मग मुलगी कोण देणार? सर्व साधारण मुलगी अशा दिव्यांग मुलाचा स्विकार करेल का...? त्यासाठी अनेक प्रयत्न केले मुली आणि पालक कुठेच जुळत नसायचे..? त्यात एक- दोन  वर्षे वयाने जास्त, सक्षम दिव्यांग रंगाने काळे सावळे असलेल्यांना संपर्क साधले असता त्यांचा देखील बिलकुल प्रतिसाद मिळत नव्हते, पण त्याचे कौतुक करणारं वर्ग मोठा होता, त्यामुळे कोणाचीतरी सहानुभूती मिळेल ही अपेक्षा पहिल्या पासून वडीलांची होती.त्या पध्दतीने शोधाशोध कार्यक्रम चालू होता.

पण लग्नाच्या बाबतीत निसर्गाने अपंगत्वाचे जन्म जरी दिलेले असले तरी त्याला न्याय सुद्धा मिळणार होते, हे नियतीला मान्य होते.असे म्हणायला हरकत नाही. पण आकाश कधीच निसर्गाला दोष देत तो रडत बसला नाही. तसे पाहता त्याचे वय देखील जास्त नव्हते, अवघे 23 वर्षे होते.एक दिवस अचानक एका मुलीचा प्रोफाईल वड्डाल वधू वर सूचक ग्रुपमध्ये पाहिला आणि संपर्क साधला ते देवासारखे माणसे भेटले एक सामान्य शेतकरीची मुलगी, नुकतेच 12 वी पास झालेली होती. जेव्हा पहिल्या भेटीत मुलीकडून होकार मिळाला, पण कोरोनाने धुमाकूळ घातला होता. पण एक संधी म्हणून केवळ 15 दिवसातच लग्न  कार्य उरकले.

    पुणे येेेेेथील एका कार्यक्रमात प्रशस्तीपत्र स्विकारताना आकाश


लग्न करून ते दोघेही सुखाचा संसार करून एकामेकांना सांभाळून घेतात हे विशेष..आपले कर्तुत्वात कुठेच कमी पडत नाही. मुलीला सुद्धा माहेर - सासर कधीच फरक वाटत नाही. त्यांनी स्वतःला कधीच बंदिस्त वाटून घेतले नाही. पुढील शिक्षण सुद्धा चालू आहे, जोडीने हिंडणे, फिरणे,  हॉटेलींग जेवण करणे, घरचे जबाबदारी सांभाळणे इत्यादी मोठ्या खुबीने सांभाळत आहेत. आदर, पाहूणचार मिळून मिसळून कसे वागायचे..? कसे राहायचे, एक आदर्श पत्नी, एक आदर्श सून आणि आदर्श लेक, एक गृहिणी तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आकाश बरोबर तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, आणि मुलीच्या पालकांची सुद्धा आभार मानावे तेवढे कमी आहेत. त्यांनी या गुणी मुलीला संस्कार आणि सुसंस्कृत बहुमुल्य ठेवा / वारसा जपण्यात घराण्यात बिलकुल कसर ठेवलेली दिसत नाही..!


अशा सुखी दांपत्याच्या लग्नास एक वर्षे पूर्ण होत आहे. त्यांनी अनमोल असा एक आदर्श ठेवा समाजाच्या नव्या पिढीसमोर ठेवले आहे. 

जन्मकुंडली, गोत्र  यामध्ये गुदमरून जाणार हे निश्चित होते. त्यांचे जन्मकुंडली जुळत नसतानादेखील लग्न झाले आहे. "जीवन म्हणजे काय, विवाह, संसार कसा करावा हे ह्या दांपत्य कडून बोध घेता येईल का पहावे ? आयुष्य किती असते आणि त्यात सुख कसे आणि कशात असते, ह्याचा शोध आणि बोध घ्या म्हणजे झाले, शंभर वर्षे रडत कुडत संस्कार करण्यापेक्षा पन्नास वर्षे शानदार ऐटीत वाघासारखे जगणे केव्हाही चांगले आहे."

छोटेखानी ९ जुलै २०२० चा विवाह सोहळा विस्मरणीय क्षण सतत स्मरणात राहील आणि आकाश- नेहाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!!


शब्दांकन:-
हरिष बंडीवडार, पुणे
मोबाईल नंबर-  88550 78478
close