(जलशुद्धीकरण केंद्राची दुरावस्था)
(ना शुद्धता ना देखभाल)
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर केज अंबाजोगाई रस्त्यालगत जल शुद्धीकरण केंद्र सोनीजवळा आहे. बारा गाव पाणीपुरवठा योजनेतून धनेगाव येथील मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो .पाणी शुद्ध करून नागरिकांना मिळावे यासाठी
कोट्यवधी रुपये खर्च करून जल शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. गेल्या वर्षभरापासून तेथील पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया पूर्णतः बंद आहे.अशुद्ध पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे.
तात्काळ जल शुद्धीकरण सुरू करावे अशी मागणी केली जात आहे. जलशुध्दीकरण केंद्र येथील फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करणे,तुरटी, ब्लिचिंग पावडर आदी साहित्य खरेदीसाठी जिल्हा परिषद , केज नगरपंचायत व धारूर नगरपंचायत मात्र याकडे लक्ष देत नाही एकमेकांवर ती टोलवाटोलवी केली जाते नागरिकांना अशुद्ध ,घाण दूषित पाणी दिले जात आहे
केज, धारूर, कासारी मैंदवाडी, तांबवा, पिसेगाव ढाकेफळ, सोनिजवळा आदी गावांना पाणी पुरवठा केला जातो केवळ जलशुद्धीकरण केंद्रातून इतरत्र पाणी पुढे पाठवले जाते तिथे पाणी शुद्ध केले जात नाही पाण्यामध्ये आलेले जंतू घाण जशीच्या तशी लोकांच्या घशापर्यंत जाऊन पोहोचते सध्याच्या काळात साथीचे रोग थैमान घालताहेत दूषित पाणी पिल्याने रोगराई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
----------------------------
वर्षभरापासून पाणी शुद्धीकरण होत नाही .केंद्र बंद असल्याचे जिल्हा परिषद व नगरपंचायत यांना माहीतच नाही
----------------------------
मुख्य टाकीत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे फिल्टर कडे पाणी जात नाही तर पाण्यामध्ये टाकण्यासाठी तुरटी ही उपलब्ध नाही
---------------------------
ज्या गावात पाणीपुरवठा होतो तेथील गावातील पाण्याच्या टाकी मध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी च पावडर ग्रामपंचायत कडून टाकली जात असल्याची माहिती त्या गावातील सरपंचांनी दिली
--------------------------
केज नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत मला माहित नाही माहिती घेऊन सांगतो अशी प्रतिक्रिया श्री सावंत यांनी दिली
----------------------------
जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीबाबत जिल्हा परिषद विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही
----------------------------
एक वर्षापासून नागरिकांना दूषित पाणी दिले जाते याबाबत प्रशासन,लोकप्रतिनिधी, नागरिक तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत.



