निवांत बसल की, निवांत कधीच नसतं मन. मन असतं ते अनेक विचारात. जगतोय खर, पण चुकतंय कुठे याचा शोध घेत असतं डोकं.
अन मन फिरून येत ते त्या खिडकी पलीकडच जग.
म्हणजे मनाचा आणि विचारांचा इथ पण काय जुळत नाही. तरी विचार त्याच्या जागी बरोबर असतात आणि मन त्याच्या जागी.
पहिला श्वास घेतल्यापासून ते शेवटच्या श्वासा पर्यंत माणूस हा बंदिस्त असतो. नाती - नाळ त्यात मग सगळंच आलं, जो एक माणूस प्राणी अनुभवतो, जगतो ते सगळंच.
लहानपण असतं घरच्यांच्या जीवावर सगळं अगदी सगळंच.
मग थोडं कळायला लागलं की थोडं शिकतो बोलायला, खायला, आपलं काम स्वतः करायला.
नंतर शाळेच वय.
कॉलेज.
मग चांगल शिक्षण झालं म्हणजे चला आता चांगल्या पगाराची नोकरी.
मग आहेच की सेटल झालं वाटलं की लग्न/ संसार .
नंतर मुलं-बाल घर ग्रहस्ति.
त्यांच्यात भविष्याच सावरात राहायचं.
कालांतराने मुलांच लग्न,
मग काय नातवंड.
वाटलं झालं सगळं...
आता आलं बाबा म्हतारपण !
मग आठवत की सगळंच पहिला श्वासापासून ने आता च्या श्वासापर्यंत सगळे किस्से, काही हसू आणणारे तर काही डोळे चिंब करणारे. सगळं बदल असतं, अनेक बदलातुन सगळं घडलेलं असतं.
मात्र " एक गोष्ट कधीच बदलत नाही ती म्हणजे विचार.
जे आहेत राहतील, अगदी मरेपर्यंत शेवटच्या घेणाऱ्या श्वासापर्यंत".
माणसाने सगळं कस ठरवून ठेवलेल असतं. ज्या वयात जे व्हायचंय ते घडतच असतं. इच्छा , अपेक्षा कधीच संपणाऱ्या नसतात म्हणून ते संपतील याचा आव आणू नका. अपेक्षाच्या पाठी धावण्यापेक्षा समाधान शोधा. आयुष्य सुंदर होईल.
शेवटी फक्त हे अस केल असतं, ते तस केल असतं तर बर झालं असतं, अस होऊ नये म्हणून जगून घ्या ! जे आवडतंय ते सगळं करून घ्या !
आयुष्य खरच सुंदर होईल जेव्हा ते समजून घेण्यापेक्षा जगून घ्यायला शिकाल. कधी तरी त्या खिडकीच्या पल्याड डोकावून बघायला शिकाल. Ordinary जगताना कधी तरी extraordinary व्हायला शिकाल !
- रोहिणी रामू वाघमारे
( नवीमुंबई )


