खंडाळा । प्रतिनिधी : दि. ०८ खंडाळा तालुक्यातील भटक्या विमुक्त जाती जमाती गोपाळ समाज हा समाज उदरनिर्वाह साठी गावो गावी फिरत आहेत. हा समाज पुर्वी पासून डोंबारी खेळ करून जीवाची पर्वा न करता पोट भरण्यासाठी गावो गावी भटकंती करत होते.तसेच या भटकंती मुळे मुलं शिक्षणापासून वंचित राहिले.
तसेच हा समाज खेळ करत करत खंडाळा तालुक्यात पूर्वी पासून प्रत्येक गावामध्ये चार पाच असे झोपड्या टाकून ऊन ,वारा, पाऊस तसेच जीवाची पर्वा न करता राहत आहेत.
आज सुद्धा कोणत्याही शासनाच्या योजना आज या समाजापर्यंत पोहचल्या नाही .हा समाज सवलती पासून वंचीत आहे.तसेच या समाजाच्या कोणत्याही शासन स्तरांवर राहत असलेल्या कोणत्याही प्रकारचे दप्तरी पुरावे मिळत नसल्याने त्यांच्या मुलांना शिक्षणा पासून वंचित राहावे लागत आहे. तरी शासनाने वेळो वेळी या गोपाळ समाजाची दखल घेऊन खंडाळा तालुक्यामध्ये शासकीय जमीन उपलब्ध करून घरकुल बांधून देण्यात यावे या मागणी साठी तहसीलदार दशरथ काळे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती जमाती सेल महाराष्ट्र राज्य, सुदामराव जाधव सातारा जिल्हा ( सरचिटणीस ) तसेच अमर पवार ,महादेव जाधव ,बाळासाहेब जाधव , यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..



