नगर प्रतिनिधी -(शिवा म्हस्के)
राहि बाळाच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने जनकल्याण रक्तपेढी व करांडे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने मोरीया क्लिनिक रेणुका नगर बोल्हेगाव फाटा अहमदनगर यांच्या सहकार्याने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरूडे यांच्या हस्ते रक्तदात्याचा सत्कार सन्मान पत्र गुलाब फुल देऊ केला.
शिबाराचे आयोजन अँड.राजेद्र करांडे यांची मुलगी लहान वयातच जगाचा निरोप घेतल्याने पैसा खर्च करणारे दानशूर व्यक्ती खुप आहे. पण रक्त तयार होणारा कारखाना कुठे हि नाही. तसेच तिची आठवण राहावी म्हणून करांडे परिवाराने राज्यात रक्तटंचाई लक्षात घेऊन रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरूडे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच डॉ.गुप्ता यांनी रक्तदान किती महत्त्वाचे व गरजेचे आहे हे विषद केले. करांडे परिवरा मार्फत स्नेहालय संस्थेला एक वेळेचे जेवण ,पॅड, दुध पावडर वाटप केले समाजाने अशा गरजू व्यक्तींना मदतीचा एक हात पुढे केल्यास राष्ट्र सक्षम होण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त केल्या. या रक्तदान शिबीराच्या माध्यमातून 20 रक्त बॅगचे संकलन झाले.
हे रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी अँड.राजेंद्र करांडे ,डॉ.मयुर चव्हाण, डॉ.किशोर पवार,सनी ढगे, रोहित मिश्रा, अमोल डागवले जनकल्याण रक्तपेढी डॉ.जी.एस. गुप्ता, ईतर परिचारिका स्टाफ, नितीन उगलमुगले , रोहित मिश्रा, अँड दिपक कालेॅ, दादासाहेब रोहकले, पत्रकार शिवा म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

