प्रमोद चौधरी । जळगाव जिल्हा प्रतिनिधी:
एरंडोल येथे डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांप्रती सन्मान व आदर व्यक्त करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा तर्फे शहरातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
१ जुलै हा दिवस डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे डॉ . बी . सी . रॉय यांना ४ फेब्रुवारी 1961 रोजी भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न बहाल करण्यात आला होता.
या डॉक्टर डे दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, एरंडोल शहरातर्फे आज एरंडोल शहरातील कोरोना काळामध्ये केलेल्या वैद्यकीय सेवेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यात एरंडोल शहरातील डॉ . सुधीर काबरा , डॉ . एस . टी पाटील , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज शेख व त्यांच्या पत्नी , डॉ गीतांजली ठाकूर , डॉ सुयश पाटील , डॉ राहुल वाघ , डॉ प्रियांका वाघ , डॉ किशोर पाटील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अमोल जाधव तालुका सरचिटणीस ,प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष, लकी महाले,कल्पेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

