shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखेर झुंज संपली.... सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय मा.श्री.गणपतराव(आबा) देशमुख यांचं दुःखद निधन...!!


विनया मेढेकर | पनवेल:-
डाव्या चळवळीचे अध्वर्यू, माजी मंत्री आणि शेतकरी चळवळीचा बुलंद आवाज, सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांची अखेर झुंज संपली. सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी (दि. ३०) रात्री साडे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले  गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेल्याच आठवड्यात त्यांच्यावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया झाली होती.                          

महाराष्ट्र विधानसभेवर सर्वाधिक काळ निवडून गेलेले कर्तव्यदक्ष आमदार असा त्यांचा लौकीकगणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. होता. सत्यशोधकी विचारांवर त्यांनी आयुष्यभर वाटचाल केली.त्यांचे संपूर्ण आयुष्य कृतीशील विचारांचा वस्तुपाठ आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये विविध खात्याचे मंत्री म्हणूनही काम पाहिले.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अतिशय महत्वाचे व महाराष्ट्राच्या विकासावर सकारात्मक परिणाम करणारे निर्णय घेतले.त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.     

साधी राहणी उच्च विचारसरणी चे प्रेरणादायी नेतृत्व राज्याच्या राजकारणात तत्त्वनिष्ठा व स्वच्छ राजकारण करून कोणतीही तडजोड न करता फक्त जनसेवेचा वसा घेऊन ‌दीर्घकाळ लोकाभिमुख राहता येतं याचा ते प्रत्यक्ष पुरावा होते.आपल्या मतदार संघात त्यांनी अनेक विधायक विकास कामे केली. विधानसभेत आवाज उठवून त्यांनी  रस्ते , विज , पाणी  यासह ग्रामीण भागातील अनेक प्रश्न मार्गी लावले.असा नेता, अशी कारकीर्द, अशी निष्ठा, अशी आमदारकी, असा विक्रम, असा साधेपणा पुन्हा होणे नाही. 

आबा, सर्वांनी  तुम्हाला पाहिलंय, ऐकलंय आणि अनुभवलंय हे पुढील कित्येक पिढ्यांना अभिमानाने सांगण्या सारखी गोष्ट असेल. गणपतराव देशमुख म्हणजे सामाजिक जाणीव,राजकीय शुचिता आणि वास्तवाची नाडी ओळखणारा दुर्मिळ सत्पुरुष. राजकारणाच्या चिखलात राहूनही स्वच्छ,कार्यक्षम नी सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा योद्धा.

गणपतराव देशमुख यांच्यात साधेपणा,साधनसुचिता नी तत्वनिष्ठा यांचा अपूर्व संगम झालेला होता.आणीबाणीच्या काळात गणपतराव देशमुखांना लागला तुरुंगवासही भोगावा लागला होता. 1977 साली गणपत आबांनी महाराष्ट्र विधानसभेच 'विरोधीपक्ष नेते' पद सांभाळले होते. त्यानंतर 1978 मध्ये शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये ते पहिल्यांदा मंत्री झाले. त्यानंतर1999 मध्ये विलासराव देशमुख यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्री झाले. 

एसटीमध्ये आमदार,खासदारांसाठी राखीव  जागा असते पण ते लोक कधीच बसत नाहीत. .. गणपतराव आबा मात्र त्याला शेवटपर्यंत अपवादच राहिले ते नेहमीच  ST च्या लाल बसमधून प्रवास करायचे.आमदार निवासात प्रत्येक आमदाराला सरकारतर्फे दररोज ४ वर्तमानपत्रे मोफत मिळतात. दर महिन्याला ती रद्दी विकून ते आलेले पैसे सरकारच्या ट्रेझरीत भरायचे. सत्तेसाठी तडजोडी,खटपटी,लटपटी करणारे आमदार मुबलक असताना त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही.असा लोकप्रतिनिधी होणे नाही.
close