shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वरकुटे खुर्द येथील जुबिन इम्रान पठाण यास इयत्ता१०वी मध्ये ९९.८० टक्के .

 वरकुटे खुर्द येथील जुबिन इम्रान पठाण यास इयत्ता१०वी मध्ये ९९.८० टक्के .

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार करून केले अभिनंदन.

जूबीन पठाण याने मिळवलेल्या विशेष प्रविण्याबद्दलअनेक स्तरातून कौतुकाचा वर्षाव.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या इयत्ता दहावीचा निकाल मध्ये वरकुटे खुर्द येथील जुबिन इम्रान पठाण याने इयत्ता १०वी मध्ये ९९.८० टक्के विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल भाजप नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी(दि.२४ जुलै) रोजी सत्कार करून अभिनंदन केले. 

यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक ॲड. कृष्णाजी यादव, भाजप युवा नेते पै. बबलू पठाण, इम्रान पठाण इत्यादी उपस्थित होते.

 जूबीन इम्रान पठाण यांनी इयत्ता दहावी मध्ये ५०० पैकी ४९६+३(चित्रकलेत विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल ३ गुण) एकूण ४९९ गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळवले असून त्याच्या या यशस्वी गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल वरकुटे खुर्द आणि इंदापूर तालुका व महाराष्ट्रातून अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचा दिसत आहे.

 झुबीन पठाण हा विद्यार्थी वरकुटे खुर्द येथे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये घेतले असून माध्यमिक इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत महात्मा फुले विद्यालय वरकुटे खुर्द या ठिकाणी सेमी इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेतले . या विद्यार्थ्याने इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत सतत विशेष गुणाने पास होऊन आपले प्राविण्य दहावीपर्यंत  राखल्याबद्दल त्याचे मनापासून कौतुक होत आहे . त्याचे वडील इम्रान पठाण हे शेतकरी कुटुंबातील असून आई आसमा पठाण या घरातील आणि वडिलांना शेतामध्ये मदत करतात त्यांनी आपल्या मुलासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन शिक्षणासाठी योग्य असे मार्गदर्शन आणि साथ दिली आहे. त्यामुळेच जुबिन पठाण सतत आपल्या शिक्षणामध्ये विशेष प्राविण्य मिळू शकला. त्याबरोबर त्याच्या या जडणघडणीमध्ये प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक यांचाही मोलाचा वाटा असल्याचे इम्रान पठाण यांनी सांगितले.
यावेळी पठाण म्हणाले की, माझा मुलगा जुबिन हा दैनंदिन व्यवहारात परिपूर्ण ज्ञानाचा उपयोग करतो. अभ्यासामध्ये तो क्रियाशील असूनही तो त्याचा अभ्यास कधीही अपूर्ण ठेवत नसे . स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यास नेहमी उत्साह असतो.स्वतःच्या आवडीनिवडी मध्ये स्पष्टता असते .कोणतेही काम एकाग्रतेने करतो. अभ्यासा व्यतिरिक्त इतरही वाचन तो करीत असतो. त्यामुळेच त्यांनी इयत्ता दहावी मध्ये ५०० पैकी ४९९ गुण मिळवून९९.८० टक्के मार्क्स मिळवून स्वतःबरोबर पठाण परिवाराचे, वरकुटे खुर्द गावाचे नाव लौकिक केले आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. त्याने असेच भविष्यामध्ये त्याच्या शिक्षणात विशेष प्राविण्य मिळवावे अशी आमची सदिच्छा आहे.
close