राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी:-
रायगड - अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. आजच म्हणजे 15 जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे.
मागील 3 ते 4 वर्षांपासून ते आजारी होते. त्यावेळच्या झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि 2004 ते 2009 या काळात अलिबाग - उरण मतदार संघाचे ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष , प्रदेश कॉग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.आज दुपारी 2 वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

