प्रतिनिधी-रफिक शेख
आष्टी (दि .१) : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या गाडीवर दगडफेक केलेली आहे.
भारतीय जनता पार्टी आष्टी तालुका कोषाध्यक्ष आजिनाथ काका बेल्हेकर युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यध्यक्ष.युवराज खटके.चंद्रशेखर साके सर.प्रा.विधाते दादा सर ग्रा.प.सदस्य.सतिश आरुण.कावळे बाळासाहेब यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.ओबीसी आरक्षण वरून महाराष्ट्र राज्यभर दौरा आमदार पडळकर साहेब करत आहेत.
दि .30 जुन रोजी आमदार पडळकर साहेब सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या स्वतःच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे.त्याच्या निषेधार्थ तमाम ओबीसी बांधवांचे मने दुखावले आहेत.त्यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.या माथेफिरुला लवकरात लवकर अटक करा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय माजी आमदार भीमसेनजी धोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथे आंदोलन करण्यात येईल
यावेळी निवेदन देताना आजिनाथ बेल्हेकर,चंद्रशेखर साके,पत्रकार.युवराज खटके,दादा विधाते,बाळासाहेब कावळे,सतीश अरुण यांनी निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.

