shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लॉकडाऊनच्या काळात आदिवासी व दुर्बल घटकांतील कुटुंबांचे अश्रू पुसण्याचे काम केले..!!


आमदार निलेश लंके.

तालुक्यातील १ हजार ३१४ आदिवासी कुटुंबीयांना खावटी वाटप..!!

नगर - प्रतिनिधी रफिक शेख

गेल्या दीड वर्षाच्या कोरोना कार्यकाळात लाॅकडाऊन असल्यामुळे शेती मोलमजुरी व भटकंती करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी कुटुंबापुढे जीवणमरणाचा प्रश्न उभा राहिला होता.


परंतु आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील अनेक कुटुंबांना खावटी वाटप करून त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केले आहे.तर दुसरीकडे पारनेर तालुक्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खावटी वाटप व दोन हजार रुपयांचे अनुदान या कुटुंबियांच्या खात्यावर जमा केले असल्याचेही आमदार निलेश लंके यांनी आवर्जून सांगितले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या १ हजार ३१४ कुुुुटुबियांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.या तालुक्यात आदिवासी व गोरगरीब जनतेसाठी आमदार निलेश लंके प्रत्येक गावागावात जावुन काम करत आहेत. आदिवासी विकास प्रकल्प निलेश लंके प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या लाभार्थ्यांच्या प्रत्येक खात्यावर २ हजार रुपये व जीवनावश्यक वस्तूंचेे 

वासुंदे कासारे कर्जुले हर्या या तीन गावांतील आदिवासींयांना वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे  युवा सेना जिल्हाध्यक्ष गणेश भोसले होते.यावेळी आत्मा कमिटीचे अध्यक्ष राहुल झावरे बापुसाहेब शिर्के सरपंच संजीवनी आंधळे शैलाताई दाते रामदास दाते बाळासाहेब खिलारी उद्योजक विजय औटी माजी सरपंच संदिप मगर दत्तात्रय आंधळे शशी कारखिले‌ संदिप कोकरे जालिंदर वाबळे धोंडिभाऊ मधे अमोल उगले‌ बालु उर्फ दत्तात्रय साळुंके संदिप चौधरी शंकरराव कासुटे सिध्दू खिलारी  यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की शासनाच्या योजना प्रत्येक झोपडी पर्यंत नेण्याचे लोकप्रतिनिधीचे आहे.गावागावात क्रिडा विभागाच्या माध्यमातून तरुणांना पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे.या आमदारकीच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे नाते ‌आहे.सर्वांत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजनेसह सार्वजनिक विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे.गेल्या ४ दिवसांपासून आदिवासी बांधवांसाठी ज्या योजना आहे त्या योजना आदिवासी विकास प्रकल्पाच्या राबविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.कर्जुले हर्या गावात अद्याप पर्यंत विविध विकास कामांसाठी ४२ लाख रुपयांचा निधी दिला आहे.महिला सक्षमीकरण करण्यासाठी बचतगट स्थापन करुन महिलांना स्वयंपुर्ण करण्याचे काम सुरू केले आहे.त्यामुळे यापुढील काळात बापुसाहेब शिर्के यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार जे रस्ते व इतर विकास कामांसाठी निधी मागितला आहे तो‌ उपलब्ध करून देण्यात येईल असे‌ आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिले आहे.या कार्यक्रमाचे आभार बापुसाहेब शिर्के यांनी मानले आहे.

आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून खावटी योजने अंतर्गत अनुदान व किराणा किटचे वाटप करताना आमदार निलेश लंके यांच्या सह बापुसाहेब शिर्के,धोंडिभाऊ मधे.

आदिवासी विकास विभागाचे काळे व शेरखान मॅडम
close