shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत युवा वॉरियर्स शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न..!



संपूर्ण राज्यात भा.ज.यु.मो. शिर्डी शहराचे काम राज्यात प्रथम क्रमांकाचे - प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील..!!

शिर्डी | दि. २४ (प्रतिनिधी) :
लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे पूजन करून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत युवा वॉरियर्स शाखा क्रमांक २ शिर्डी येथे शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. भाजपा सरचिटणीस चंद्रशेखरजी बावनकुळे व प्रदेशाध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करत मोठ्या उत्साहात पार पडले. 


याप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, युवा वॉरियर मध्ये येणाऱ्या तरुणांच्या ज्यांकाही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्या कला गुणांना वाढविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी युवा वॉरियर्स संयोजक अनुपजी मोरे, प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैंडजी, उत्तर नगर जिल्हा प्रभारी कपिलजी पाटील, युवा वॉरियर्स विभागीय संयोजक अनिकेत पाटील, सचिव विजय बनछोड, सदस्य किरण बोराडे, अंकित संचेती, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, उत्तर भारतीय सेल जिल्हाध्यक्ष राजेशजी शर्मा, शहराध्यक्ष सचिन शिंदे, शहराध्यक्ष योगेश अण्णा गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 


यावेळी शिर्डी शहर युवा वॉरियर्स अध्यक्ष पदी तुषार संजय महाजन यांची नियुक्ती करण्यात आली, सरचिटणीस पदी भावेश जोशी, विशाल चव्हाण, मयूर आडगळे यांची तर ८-उपाध्यक्ष, ८-चिटणीस, ५-सदस्य अशी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुवक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा व युवा वॉरियर्सचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहरचे केलेल्या कामाबद्दल  प्रदेशाध्यक्ष कडून कौतुकाची थाप दिली व संपूर्ण राज्यात भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराचे काम राज्यात प्रथम क्रमांकाचे काम असल्याचा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले.
close