shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'वर्ल्ड सामना ' विनोदी दिवाळी अंकासाठी लेखन पाठविण्याचे आवाहन ..!!


श्रीरामपूर(प्रतिनिधी):- येथील 'वर्ल्ड सामना' विनोदी  'दिवाळी अंक गेल्या 29 वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होत असून या अंकाने आतापर्यन्त अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत,2021 चा विनोदी दिवाळी अंक लवकरच प्रकाशित होत आहे, या अंकासाठी लेखन साहित्य पाठविण्याचे आवाहन मुख्य संपादक प्रकाश बापूराव कुलथे यांनी केले. 

 प्रकाश कुलथे,मुुुुुख्य संपादक " सा.वर्ल्ड सामना"

'वर्ल्ड सामना 'दिवाळी ग्रामीण विनोदी कथा विशेषांक दसरा, दिवाळी शुभमुहूर्तावर प्रकाशित होणार असून साहित्यिकांनी आजच्या काळातील राजकारण, समाजकारण, धर्मकारण,अर्थकारण,आरोग्य, शिक्षण, न्याय, शेती, शेतकरी, शेतमजूर,कामगार, विविध व्यवसायिक,सेवाभावी कार्य, व्यक्ती, संस्था,दुर्लक्षित घटक अशा विविध विषयावरील विनोदी कथालेखन सकारात्मक आणि संस्कृती संवर्धक लेखन स्वीकारले जाईल.विनोदी चारोळ्या, कविता, व्यंगचित्रे,ललितगद्य, विनोदी आत्मकथा,विनोदी चरित्रकथा,विनोदी नाट्यात्मक प्रसंगकथा दिवाळी अंकात घेतल्या जातील. तसेच जाहिराती आणि आगामी मागणी यांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.लॉकडाऊनचा काळ असल्याने साहित्यिकांनी आपले लेखन, छायाचित्रे, व्यंगचित्रे योग्य स्वरूपात अक्षरबद्ध व शक्यतो कथा व्हॉट्स अप वर टाईप करून 9822424002 या क्रमांकावर अथवा worldsamana@yahoo.com या ईमेल पत्त्यावर आपल्या नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक सह पाठवावी. 

ज्या लेखकांना शक्य नसेल त्यांनी खालील कार्यालय पत्त्यावर 15 आगस्ट 2021 पर्यंत मिळेल अशा बेताने पाठवावे असे आवाहन मुख्य संपादक प्रकाश कुलथे,प्रकाशिका सौ. स्नेहलता कुलथे, निवासी संपादक डॉ. बाबुराव उपाध्ये, कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे यांनी केले आहे. लेखकांनी आपली कथा प्रकाश बापुराव कुलथे,वर्ल्ड सामना कार्यालय,  जिजामाता चौक, वॉर्ड नं. 03, श्रीरामपूर 413709 जि. अहमदनगर येथे वेळेत पाठवण्यात यावी असे आवाहन करण्यात आले.
close